लाईफस्टाईल

आपला गण कसा ओळखावा.

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ, मित्रांनो तुम्ही तुमची पत्रिका पहिली असेल तर तुम्ही त्यावर आपला गण पाहिला असेलच. ह्या गणाचे तीन प्रकार असतात राक्षसगण, देवगण, व माणूसगण आणि ह्या गणानुसार व्यक्तीचा स्वभाव असतो असे म्हण्टले जाते मग कोणत्या व्यक्तीच्या गणाचा स्वभाव कसा असतो. चला तर जाणून घेऊयात आजच्या लेखात.

मित्रांनो सुरवात करूयात देवगणापासून, ह्या गणाची व्यक्ती ह्या स्वभावतःच उधार असतात, बुद्धिमान, श्रेष्ठ आणि उच्च विचार असणाऱ्या असतात. चेहरा सुंदर व आकर्षक वाटतो, स्वभाव साधा व सरळ असतो. ह्यांच्यामध्ये दया, माया, प्रेम आणि सहानभूती परोपकाराची भावना असते. सात्विक गुण जास्त असतात गरजू दुःखी पीडितांना साह्य करण्यासाठी ह्या व्यक्ती पुढे असतात. सत्यासाठी लढणारा ह्यांचा स्वभाव असतो, आणि दानधर्म करणे देखील ह्यांच्या स्वभावात असतेच.

आता जणूयात मनुष्यगाणाबद्दल, मनुष्यगण असणाऱ्या व्यक्ती ह्या स्वभावानी मानी दृढ निश्चयी आणि जनसमुदायाला आपणस करणाऱ्या असतात. सुखी जीवन आणि संसारासाठी सतत धडपड करणाऱ्या असतात. मनुष्य गणाच्या व्यक्तींमध्ये रजगून जास्त असतो, म्हणजेच भौतिकवादी असतात. तसेच ह्या व्यक्तींमध्ये राक्षस व देव गण ह्या दोन्हीतले थोडे थोडे गुण असतात. व्यवहार कुशल असतात व काळ बगुन वागणाऱ्या असतात.

आता जाणून घेऊयात राक्षसगण, राक्षसगण असणाऱ्या व्यक्ती नावाप्रमाणे राक्षस असतात असे नाही मात्र हो तमोगुणी नक्कीच असतात. तमोगुणात त्या थोड्या अहंकारी शीघ्रकोपी, चिडखोर, तसेच हट्टी असतात. सर्व प्रकारचे भोग भोगण्याची ह्यांची इच्छा असते ह्यांच्यात काही विशिष्ठ गुण असल्याचे देखील आढळून येते. ह्यांना वातावरणात एखादी नाकारात्मक शक्ती असेल तर त्याची जाणीव खूप लवकर होते. अदृश्य शक्तींचा आभास देखील ह्यांना होतो. गंध, चव, वास ह्या सगळ्याची जाणीव त्यांना होते. ह्यामुळेच आत्म्यांचे दर्शन घडणे अमानवीय गोष्टी दिसणे ह्यांच्या बाबतीत घडू शकते.

मात्र ह्या लोकांमध्ये आत्मविश्वास प्रबळ असतो कुठल्याही परिस्थतीत ते डगमगत नाहीत अतिशय हिंमतीने तोंड देत राहतात. मग मित्रांनो तुमचा गण काय आहे आणि ह्याबाबतचा तुमचा अनुभव काय आहे ह्याबद्दलचा अनुभव तुम्ही कंमेंट करून आम्हाला नक्की सांगा. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट