जाणून घ्या अधिक मासाचे महत्व, coffe with stories
धार्मिक

जाणून घ्या अधिक मासाचे महत्व आणि हा ३ वर्षातून एकदा का येतो ?

जाणून घ्या अधिक मासाचे महत्व आणि हा ३ वर्षातून एकदा का येतो ?

याला मलमास, पुरुषोत्तम मास आणि महाराष्ट्रात धोंडामास असेही म्हणतात.या महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. संपूर्ण भारतभरातील हिंदू धार्मिक लोक या महिन्यात धार्मिक कार्य, पूजा, भागवत भक्ती, उपवास, जप आणि योग इत्यादीमध्ये व्यस्त असतात. २०२० हे वर्ष बर्‍याच बाबतीत विशेष राहिले आहे, मग तो कोरोनाकाळ असो किंवा ज्योतिषदृष्ट्या असा योगायोग सुमारे १६५ वर्षानंतर झाला आहे. खरं तर, या वेळी श्राद्ध पक्ष संपेल आणी अधिक महिना लागेल आणि त्या कारणामुळे नवरात्र आणि पितृपक्ष यांच्यात सुमारे एक महिन्याचे अंतर असेल. अश्विन महिन्यात अधिक महिना येणे आणि दुर्गापूजन एका महिन्यानंतर सुरू होते, हा किरकोळ योगायोग नाही.

significance of donation in adhik maas: Adhik Maas Donatio, adhik maas, adhik maas

दर तीन वर्षांनी का येतो ?

आपले सण व व्रत ही चंद्रावर आधारित आहेत, तर ऋतू हे सूर्यावर आधारित असतात. विशिष्ट सणव्रत -वैकल्यं ही ठराविक ऋतूंमध्येच यावीत यासाठीच चांद्रवर्ष व सौरवर्ष यांचा ताळमेळ साधणं गरजेचं असते .पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 365 दिवस, 5 तास48 मिनिटं व 46 सेकंद लागतात. यालाच ‘सौरवर्ष’म्हणतात तर चंद्राला पृथ्वीभोवती बारा प्रदक्षिणा घालण्यास 354 दिवस, 8 तास, 48 मिनिटं आणि 34 सेकंद एवढा काळ लागतो. यालाच चांद्रवर्ष म्हणतात.यामुळे दरवर्षी ‘चांद्रवर्ष’ व ‘सौरवर्ष’ यामध्ये अकरा दिवसांचा फरक पडतो. एका चांद्रवर्षात 360 तिथी येतात. तर एका सौरवर्षात 371 तिथी येतात.हे अंतर अधिक वाढत जाऊ नये, तसंच या दोन्हींमदे  समन्वय व्हावा म्हणूनच प्रत्येक तीन वर्षानी चंद्रवर्षातील एक महिना अधिक धरला जातो. या वाढीव महिन्यास ‘अधिकमास’ म्हणले जाते.

significance of donation in adhik maas: Adhik Maas Donatio, adhik maas, adhik maas

आपल्याकडे जावायला विष्णुरूप माणून त्याला या महिन्यात आहेर करणे अथवा सोने/चांदी चे धोंडे दान स्वरूपात देण्याची प्रथा आहे. या वरून याला “धोंडे” मास हे नाव पडले आहे.ह्या मासात जावयांचे फार गोडकौतुक असते विशेषत: नवविवाहितांसाठी सासुरवाडीतून भेटवस्तूंची रेलचेल सुरु असते.  पहिल्या अधिक मासाला आजकाल जावायला चांदीचे ताट दिले जाते त्यात ३३ अनारसे देऊन त्यात दीप प्रज्वलित करून जावायला वाण दिला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट