नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे हर हर महादेव. मित्रांनो आपल्या घरात अशी एखादी तरी व्यक्ती असेलच कि ज्याला लहान सहान गोष्टींवरून राग येतो संताप होतो. तर अश्या रंगीत संताप येणाऱ्या व्यक्तीला शांत करण्यासाठी शिवमहापुराणात एक उपाय सांगितला आहे. हा उपाय तुम्ही कोणत्याही शिवरात्रीस करू शकता. शिवरात्री हि प्रेत्येक महिन्यात असते, आपण ती कधी आहे ते आपण कॅलेंडर किंवा पंचांगामध्ये पाहू शकता. ह्या शिवरात्रीच्या दिवशी हा छोटासा उपाय केल्यास रागीट व्यक्ती क्रोधक व्यक्ती शांत बनते.
हा उपाय केवळ एकदाच करायचा आहे. उपाय करण्यासाठी आपण पाच बेलपत्र म्हणजेच बेलाची पाने आपण घ्याची आहेत. आणि त्याचे देठ जे आहेत ते आपण तोडायचे आहेत. पाच बेलपत्रांचे पाच देट तोडून आपण जवळपास असणाऱ्या महादेवांच्या मंदिरात जायचं आहे. जाताना आपण एक तांब्याभर जल घेऊन जाण्यास विसरू नये. त्याठिकाणी जाऊन आपण हे पाच देठ शिवलिंगाच्या अश्या भागावर जिथून पाणी ओघळून खाली पडते आपण हि जागा लेखामधील प्रथम चित्रात दर्शवली आहे, त्या जागी आपण ते ठेवायचे आहे.
हि जागा म्हणजे भगवान शंकरांची जी सर्वात धाकटी कन्या आहे तिझे नाव अशोकसुंदरी. हे पाच देठ आपण तिथे ठेवायचे आहे. त्यानंतर आपण हटकेश्वर महादेव महाराजांचे स्मरण करायचे आहे. हटकेश्वर महादेव हे कोणत्याही व्यक्ती जो खूप हट्टी आहे जो कोणत्याही गोष्टीला खूप ताणतो त्या व्यक्तीला ते शांत करतात. तसे तर हटकेश्वर महाराजांचे माहात्म्य खूप मोठे आहे ते आपण नंतर लेखात सांगू. तर अश्या प्रकारे आपण हटकेश्वर महाराजांचे नाव घ्याचे आहे, त्यानंतर आपण आपल्या घरातून आणलेले जल आपण शिवलिंगवरती अर्पण करायचे आहे.
जल अर्पण करताना आपण ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप आपण करायचा आहे. आणि प्रार्थना करा कि आपल्या घरातील जी कोणती व्यक्ती आहे ती शांत होउदे म्हणून रागीट व्यक्ती स्वतः देखील स्वतःसाठी हा उपाय करू शकते. हे जल अर्पण केल्यानंतर हे जल अर्थातच वाहत वाहत जिथे अशोकसुंदरीचे स्थान आहे तिथून खाली वाहत येणार आहे व पाण्यासोबत ह्या पाच बेलाच्या देठाच्या काड्या आहेत त्यातील काही काड्या खाली पडतील जितके देठ खाली पडतील तितके आपण उचलायचे आहेत.
ज्या व्यक्तीला राग येतो जे कोणी क्रोधीत व्यक्ती आहे संताप करते अश्या व्यक्तीला हे देठ खाऊ घाला. मित्रांनो फक्त एक शिवरात्री आपण हा उपाय करून पहा महादेवांच्या कृपेने त्या व्यक्तीचा राग नक्की शांत होईल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद




