धार्मिक

१० एप्रिल पासून १३ एप्रिल गुढीपाडव्यापर्यंत घरात इथे ठेवा एक सुपारी

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो १० एप्रिल पासून १३ एप्रिल गुढीपाडव्यापर्यंत घरात इथे ठेवा एक सुपारी ह्या सुपारीचा उपाय केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मनात जेही असेल ते सर्व काही तुम्हाला मिळेल, मित्रांनो गुढीपाडव्यापर्यंत हा सर्वात मोठा शुभ मुहूर्त असतो १३ तारखेला गुढीपाडव आहे आणी १४ तारखेला स्वामींचा प्रकट दिवस आहे. ह्या शुभ मुहूर्तावर बरेचशे लोक नवीन कामे धंदे सुरू करत असतात. नवीन गोष्टी विकत घेतात, पूजन करतात तर मित्रांनो ह्याचा शुभमुहूर्तावर करायचा आहे शनिवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सकाळी, दुपारी किंवा संध्यकाळी केव्हाही तुम्ही करू शकता.

ह्या उपायासाठी तुम्हाला फक्त एक पूजेची सुपारी लागेल हि पूजेची सुपारी हि नवीन कोरी असावी. ती घेऊन आपण उपाय करण्यापूर्वी तिला स्वछ पाण्याने धुवून घ्यावी. त्यानंतर ती सुपारी आपण स्वामी समर्थांच्या फोटोसमोर देवघरात मध्यभागी ठेवून द्याची आहे. त्यानंतर त्यावर हळदी, कुंकू, अक्षदा, फुले वाहून त्याची पूजा करावी व त्यानंतर अगरबत्ती व दिवा लावून ओवाळावे व त्यानंतर आपण हात जोडून प्रार्थना करावी कि जी काही आपल्या मनात इच्छा आहे प्रार्थना आहे. ती बोलून दाखवावी व आपली इच्छा पूर्ण करा अशी स्वामींना प्रार्थना करायची आहे. आणि हि सुपारी पूजा केलेल्या दिवसापासून म्हणजे १० एप्रिल पासून १३ एप्रिल गुढीपाडव्यापर्यंत घरात ती सुपारी त्याच ठिकाणी देवघरात ठेवायची आहे.

१४ तारखेला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे त्यानंतर आपली जी सकाळची देवपूजा व इतर दिनचर्येची कामे आहेत ती कामे आपण करायची आहेत व त्यानंतर ती सुपारी तिथून उचलून तिला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे आहे. वाहते पाणी नसेल तर तुमच्या आजूबाजूला एखादे झाड पाहू त्या झाडाखाली मातीत ती सुपारी आपण पुरून द्यावी. असा हा उपाय आपण १० एप्रिल पासून गुढीपाडव्यापर्यंत आपल्याला करायचा आहे. हा उपाय सर्वानी अवश्य करा तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण होईल. आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट