नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो उद्या म्हणजे ११ फेब्रुवारी मौनी अमावस्या गुरवाच्या दिवशी आली आहे. आणि बाकीच्या अमावास्यांपेक्षा ह्या मौनी अमावस्याचे महत्व काही वेगळेच आहे. मौनी अमावस्या च्या दिवशी हा एक उपाय करा तुमचे सर्व इच्छा ज्या खूप दिवसापासून अपूर्ण आहे अश्या तुमच्या सर्व इच्छा तसेच तुच्या जीवनातील अडथळे दूर होतील व सर्व तुमच्या जीवनात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडेल. ह्या वर्षीची मौनी अमावस्या बुधवारी म्हणजे आज मध्यरात्रीच १:०८ मिनीटांनी सुरु होत असून ती गुरुवारी १२:३५ मिनीटांनी होईल. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी येत असलेली हि पौष महिन्यातील अमावस्या आहे ज्याला दर्श मौनी अमावस्या असे देखील म्हणतात. ह्या दिवशी करायचे आपण काही उपाय सांगणार आहोत.
पहिला उपाय जो कि खूप जास्त प्रभावकारी आहे तो म्हणजे, मौनी अमावस्या च्या रात्री आपल्या घरातील ईशान्य म्हणजे पूर्व आणि उत्तर ह्यांच्या मधील दिशा ह्या दिवशी घरातील कोपरा साफ करा कारण ह्या दिशेला देवी देवतांची दिशा मानले जाते म्हणूनच ह्या दिशेची हॅन्गली स्वछता करून त्या ठिकाणी एक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. तूप मात्र गाईचंच वापरावे कारण गौमातेमध्ये ३३ कोठी देव असतात म्हणून आपण गाई च तूप वापरावे. दिवा लावाच्या आधी तो एका प्लेट घेऊन त्यामध्ये थोडे तांदूळ घालावेत व नंतर त्यावर दिवा ठेऊन दिवा प्रज्वलित करावा.हा उपायाने माता लक्षमीची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहते. घरामध्ये पैसे येण्यास सुरवात होते. आपली आर्थिक अडचणी पूर्णपणे दूर होतात. हा दिवा लावताना आपण जी वाट वापरतो ती लाल रंगाची असावी मग तुम्ही त्यासाठी लाल रंगाचा धागा वापरला तरी चालेल. व दिवा पेटवून झाल्यानंतर तुम्ही त्यात २-४ काड्या केशर टाकायचे आहे. लाल रंग हा माता लक्ष्मीस प्रिय आहे.
दुसरा उपाय म्हणजे खूप लोकांच्या जन्मकुंडलीमध्ये दोष असतात आणि त्यामुळे कोणत्या तरी कारणाने का होईना आपली काही कामे अपूर्ण रहातात. नेहमी आपल्या कामामध्ये अडचणी व बाधा येत राहतात. ह्यवरती उपाय म्हणून तुम्ही मौनी अमावस्याच्या दिवशी काही गरजू लोकांना तुम्हाला जेवढे जमेल दान करावे जसे तुम्हाला जमेल तसे दान करावे तुमच्या कुवतीनुसार. मित्रांनो ह्या दिवशी केलेलं अन्नदानाला तर खूप जास्त महत्व आहे ह्या दिवशी अन्नदान केल्याने आपल्या जीवनातील सर्व काही अडचणी दूर होतात.
मित्रानो अनेकदा आपल्याकडून कळत नकळत का होईना काही पाप आपल्याकडून घडत असतात आणि त्याच्या प्रभावाने आपल्या जीवनात खूप साऱ्या अडीअडचणी येतात अश्या वेळी तुम्ही मौनी अमावस्याच्या दिवशी हा एक उपाय जरूर करा तो म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा कोणत्यातरी झाडाखाली आपल्याला काळ्या मुंग्या दिसतील त्यांना तुम्ही पिठीसाखर व थोडे गव्हाचे पीठ मिक्स करून त्यांना खायला घाला त्यामुळे तुच्यावरती जे पाप असतील त्यातून तुमची मुक्ती होईल पुण्यसंचय होतो.
मौनी अमावस्या दिवशी जेपण आपण उपाय करत असता ते तात्काळ व प्रभावी असतात म्हणून तुम्हाला देखील तुमच्या जीवनात काही अडीअडचणी असतील तर तुम्ही नक्की आपण सांगितलेले उपाय करा तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद




