धार्मिक

११ मार्च: महाशिवरात्री, गुपचूप ठेवा इथे एक बेलाचे पान.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो ११ मार्च गुरुवारच्या च्या दिवशी अली आहे. ज्या लोकांना संपूर्ण वर्षात एकही उपवास करणे शक्य होत नाही अश्या लोकांनी किमान महाशिवरात्री व्रत ह्या दिवशी आपण उपवास करावा ज्यामुळे आपल्याला संपूर्ण वर्षभराचे पुण्य प्राप्त होते. मित्रांनो सोबतच करायचे काही उपाय आपण सांगणार आहोत. ज्यामुळे आपले जीवनामध्ये धन, सुख समृद्धी सर्व काही मिळते.
हिंदू धर्मशास्त्रानुसार महाशिवरात्री च्या दिवशी कोणत्याही दिवशी एखाद्या गोर गरिबाला अन्नदान अवश्य करावे. त्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नाची कमतरता कधीच भासत नाही. आपल्या पीत्रांच्या आत्म्याला शांती लाभते व परिणामी आपली पितृदोषातून मुक्ती होते.

ज्यांच्या जीवनामध्ये मानसिक ताणतणाव आहे ज्यांना शांती लाभत नाही अश्या लोकांनी भगवान शंकराची पूजा करत असताना शिवलिंगावर एक तांब्या भर जल नक्की अर्पण करावे. आणि हे जे पाणी तुम्ही घेत आहेत त्या पाण्यामध्ये थोडे काळे तीळ त्यात टाकावे. आणि हे तीळ मिश्रित पाणी आपण शिवलिंगावरती टाकताना ओम नमः शिवाय…! ह्या मंत्राचा जाप करत हा उपाय केल्याने आपल्या मनाला शांती लाभते.

महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातील जे गहू चे पीठ असते त्या पिठापासून आपण ११ शिवलिंग बनवायचे आहेत. आणि ह्या शिवलिंगावर जलाभिषेक करावा असे केल्याने संतानप्राप्तीचा योग आपल्याला होतो. जर तुम्हाला संतानप्राप्तीची इच्छा असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. मित्रांनो आपल्या घरात कोणी सतत आजारी पडत असेल तर घरातून हे रोगराई दूर करण्यासाठी शिवलिंगावर १०१ वेळा जलाभिषेक करावा. छोटेशे पात्र घेऊन त्यात शिवलिंग ठेवून हा एका मंत्राचा जाप करत त्यावर जलाभिषेक करावा. तो मंत्र आहे “ॐ हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः, ॐ त्र्यम्‍बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्, उर्वारुकमिव बन्‍धनान्मृ, त्‍योर्मुक्षीय मामृतात्, ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ !!” ह्या मंत्राचा जाप केल्याने आपल्या घरातील मोठ्यातले मोठे आजारपण दूर होते.

मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी २१ बेलपत्रे म्हणजेच बेलाची पाने जी कि महादेवांना अतिशय प्रिय आहेत. आपली एखादी अनेक दिवसांपासूनची एखादी इच्छा असेल तर हि इच्छा पूर्ण करण्यासाठी ह्या दिवशी चंदनाच्या मदतीने त्यावर ओम नमः शिवाय…! असं लिहावे, आणि हे लिहल्यानंतर हि २१ बेलपत्रे आपण शिवलिंगावरती अर्पण करावेत. त्यानंतर आपण भोलेनाथांना आपली इच्छा बोलून दाखवावी. आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात.

शिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला एखादा बैल दिसला तर तुम्ही ह्या दिवशी त्याला हिरवा चार अवश्य घाला कारण बैल हे महादेवांचे वाहन आहे असे केल्याने आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते. तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट