मित्रांनो १२ एप्रिल मंगळवारचा दिवस आणि ह्या दिवशी आलेली आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी हि एकादशी जिला कामदा एकादशी असे म्हणले जाते. वर्षभरात २४ एकादशी येतात आणि ज्या महिन्यात आदिक मास असतो, त्या वर्षी दोन एकादशी जास्त येतात म्हणजेच २६ एकूण एकादशी येतात. हिंदू धर्मशास्त्रात एकादशीच्या व्रताला सर्वश्रेष्ठ व्रत मानण्यात आले आहे. एकादशी तिथी हि श्री हरी विष्णूंची सर्वात प्रिय तिथी मानण्यात येते. म्हणूनच अगदी छोटे छोटे उपाय केल्याने ह्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू ह्यांना प्रसन्न करणारे आहेत.
मित्रानो १२ एप्रिल २०२२ मंगळवारी आपण रात्री झोपण्यापूर्वी आपण ह्या एका मंत्राचा जप आपण अवश्य करा. हिंदुधर्म शास्त्रात अशी मान्यता आहे कि हि कामदा एकादशी जी आहे ती भक्तांच्या दुःखाचे निवारण करते. ह्या दिवशी जो कोणी व्यक्ती मनोभावे पूजा करतो त्यांना सर्व दुःखातून मुक्ती मिळते. सोबतच त्याचे भाग्य सुद्धा तेज बनते. मित्रांनो ज्यांना शक्य आहे त्यांनी ह्या दिवशी व्रत अगदी निर्जला करावे म्हणजेच पाणी देखील न पिता.
ह्या दिवशी आपण पिवळ्या रंगाची कपडे घालून आपण भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केल्याने ते आपल्यावर लवकर प्रसन्न होतात. ह्या दिवशी पूजा केल्याने आपल्या सर्व समस्यांतून मुक्ती मिळते शिवाय आपले भाग्य देखील बलवान बनते. भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्यांना ह्या दिवशी पूजेत पिवळ्या रंगाची फुले वाहावीत तसेच पूजेनंतर आपण पिवळ्या रंगाची मिठाईचा नैवद्य आपण दाखवावा. केवढा देखील ह्या दिवशी अर्पण केल्याने त्या व्यक्तीची प्रगती नक्की होते.
मित्रांनो कामदा एकादशीला ह्या दिवशी ज्यांना आपल्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी दूर करायच्या आहेत त्यांनी ह्या दीवशी गोरगरिबांना हरभरा डाळ किंवा चण्याची डाळ जिला आपण म्हणतो ती आपण दान अवश्य करावे. सोबतच पिवळ्या रंगाचे दान ह्या दिवशी केल्याने घरात सुखसमृद्धी नांदू लागते. ज्यांच्या जीवनात विवाहसंबंधी अडचणी येत आहेत ज्यांचे लग्न जुळून येत नाहीये त्यांनी भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजेत आपण हळकुंड भगवान श्री हरी विष्णूंच्या चरणी आपण नक्की अर्पण करावी. हळकुंड घेताना त्या अंखड असाव्यात व त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात.
ह्यानंतर आपण आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती बोलून दाखवावी. आपल्या सर्व विवाहसंबधी सर्व अडचणी दूर होतील व आपले लग्न लवकर होईल. त्यानंतर मित्रांनो आजचा लेखाचा मुख्य विषय म्हणजे आपण रात्री झोपण्यापूर्वी ह्या दिवशी ह्या मंत्राचा जप करावा, तसे पहिले तर तुम्ही ह्या मंत्राचा जप अगदी दिवसभरात कधीही करू शकता मात्र काही लोकांना वेळ नसतो तर अश्या व्यक्तींनी अगदी झोपण्यापूर्वी कोणत्याही मुद्रेत आपण ह्या मंत्राचा जप करावा.
मित्रांनो मंत्र आहे ओम नमो भागवते वासुदेवाय ! ह्या मंत्राचा जप आपण ११ वेळा कमीत कमी करावा जास्तीत जास्त तुम्हाला जमेल तेवढा करावा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद




