धार्मिक

१३ ऑगस्ट शुक्रवार नागपंचमी करा हा एक उपाय, घरात सुख समृद्धी व धन येईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो श्रावण महिना सुरु झाला म्हणजे सर्व हिंदू सणांना सुरुवात झालीच म्हणून समजा ह्यातील सर्वात पहिला येणार सण म्हणजे नागपंचमी मित्रांनो ह्या वर्षी नागपंचमी हि १३ ऑगस्ट शुक्रवारच्या दिवशी हा सण आला आहे ह्याच्या एक दिवस आधी भावाचा उपवास केला जातो, आणि नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून तो सोडला जातो. ज्या महिलांची विवाहानंतर पहिलीच नागपंचमी असते अश्या स्त्रिया सणासाठी माहेरी येतात.

पूर्वीच्या काळी हा सण फार उत्सवाने साजरा केला जात असत महिला झोके खेळायच्या हातावर मेहंदी काढायच्या नवीन वस्त्रे नवीन अलंकार घालून हा दिवस साजरा करत असत. मित्रांनो ह्या दिवशी मनोभावे नागदेवतेचे पूजन केल्याने कुटुंबाला सर्पदोषपासून कोणतीही बाधा होत नाही. अनेक जणांना असे वाटत असेल कि साप दूध पित नाही तर नागपंचमीला आपण नागाला दूध का अर्पण करतो.

तर मित्रांनो ह्या माघे एक कथा आहे महाराज जन्मेजय ह्यांनी नागयज्ञ केला होता परंतु हा यज्ञ दरम्यान बऱ्याच नागांचे शरीर जळाले त्यांच्या शरीराची लाही लाही झाली तेव्हा आस्तिक ऋषींनी त्यांच्या अंगावरती दूध टाकून रक्षण केले तेव्हापासून नागपंचमीला नागाला दूध अर्पण करण्याची परंपरा सुरु झाली आहे. म्हुणुनच नागदेवतेची दर्शन मिळवण्यासाठी आपण ह्यादिवशी त्यांना दूध व लाह्या अर्पण नक्की करा. मित्रांनो धूप दीप अक्षता देखील आपण अर्पण करावा ज्यामुळे नागदेवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो.

मित्रांनो नागदेवतेचे आपल्या हिंदुधर्मशास्त्रात फार महत्वव आहे कारण शिवशंकर ह्यांच्या गळ्यात देखील त्यांनी नागाला गळ्याबोहती लावलेले आहे तसेच विष्णू देखील नागवरती बसलेले आहेत. समुद्र मंथनात सुद्धा वासुकी नावाच्या नागाने समुद्रमंथन करण्यात मदत केली होती. भविष्यपुराणानुसार जी व्यक्ती ह्या दिवशी नागाची पूजा करते त्या व्यक्तीच्या घरात धानसमृद्धीचे आगमन होते, तसेच हे व्रत ज्या व्यक्ती करतात त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. मित्रांनो ज्यांच्या कुंडलीत कालसर्पदोष असेल तर त्या व्यक्तींनी ह्या दिवशी नागदेवतेची पूजा अवश्य करा.

हि पूजा झाल्यावर ते प्रसन्न होण्यासाठी त्यांच्या ह्या मंत्राचा जप देखील आपण करा मंत्र असा आहे ‘नमोस्तु सर्पेभ्यो ये के च पृथ्वी मनु! ये अंतरिक्षे दिवि तेभ्य: सर्पेभ्यो नम:।।’ हा मंत्र बोलून आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती आपण बोलून दाखवायची आहे व हाथ जोडून ती पूर्ण होऊदे अशी प्रार्थना करायची आहे. नागदेवतेची पूजा करण्यासाठी आपल्याला वारुळाच्या ठिकाणी जाणे शक्य नसेल तर आपण नागदेवतेचा फोटो आणून आपण त्याची पूजा केली तरी चालते.

मित्रांनो अनेक स्त्रिया ह्या नागदेवतेला आपला भाऊ मानतात आपले रक्षण करण्याची प्रार्थना केली जाते. परंतु पूजा करताना एक चूक करतात ती म्हणजे ह्या नागांना त्या दूध पाजू पाहतात अश्या प्रकारे नागांना दूध पाजल्याने अनेक नागांचा मृत्यू देखील झाला आहे. तर अशी चूक करू नका. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट