धार्मिक

१४ डिसेंबर मंगळावर मोक्षदा एकादशी, फक्त करा हा उपाय.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो १४ डिसेंबर मंगळवारचा दिवस आणि ह्या दिवशी आलेली आहे मोक्षदा एकादशी. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीस मोक्षदा एकादशी असे म्हणले जाते ह्या दिवशी गीता जयंती देखील आहे. मित्रांनो एकादशीचे व्रत हे विष्णूंचे सर्वात प्रिय व्रत आहे हे व्रत आपण केल्याने आपल्याला सर्व प्रकारच्या पापातून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर स्वर्ग म्हणजेच वैकुंठाची प्राप्ती होते. सोबतच जे आपले पूर्वज आहेत म्हणजेच आपल्या घरातील जे काही लोक ज्यांचा मृत्यू झालेला आहे अश्या पूर्वजांनासुद्धा मोक्षाची प्राप्ती होते.

ह्या वर्षीच्या आलेल्या एकादशीला सर्वार्थसिद्धी योग आणि अमृतसिद्धी योग असे दोन योग जुळून आलेले आहेत. ह्या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा नक्की करा, आज आपण काही छोटे छोटे करावयाचे उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या अनेक प्रकारच्या अडचणी दूर होतील. जीवनातील दुःख दूर होऊन सुखाची प्राप्ती होईल. आणि घराची आपली पैस्यांची स्थिती सुधारेल.

मोक्षदा एकादशी ह्या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा करावी पूजेच्या वेळी आपण पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावीत. भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून पिवळ्या रंगाची फुले, फळे, धान्य नैवेद्यातील मिठाई हि पिवळ्या रंगाची ठेवावी. मित्रांनो ह्या दिवशी मोक्षदा एकादशीची कथा नक्की श्रवण करा. व्रतकथेचे श्रवण केल्यानंतर आपण आपली इच्छा विष्णूंपुढे नक्की बोलून दाखवावी, आपली इच्छा नक्की पूर्ण होईल.

विष्णूंना नैवेद्यात खीर दाखवावी खीर दाखवताना त्यावर दोन तुळशीपत्र पालथी घालावीत, जेणेकरून घरात सुख सौभाग्य लाभेल. ज्यांची आर्थिक स्थिती कमजोर आहे त्यांनी ह्या दिवशी पिंपळाच्या वृक्षास जल नक्की अर्पण करावे, हे जल अर्पण करताना ओम नमो भागवते वासुदेवाय हा मंत्र जप करा. पिंपळाच्या मुळांमध्ये भगवान श्री हरी विष्णू वास करतात कर्जमुक्तीसाठी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होते. ह्या दिवशी आपण जितके जास्त दान गोरगरिबांना करता येईल तितके करा.

हे पण वाचा :-  मागेल ते मिळेल अंघोळी नंतर उरलेले पाणी गुपचूप फेका इथे.

शकयतो आपण पिवळ्या रंगाच्या गोष्टींचे दान आपण करावे गोरगरिबांच्या आशीर्वादाने जीवनातील मोठ्यात मोठया समस्या संकटे कष्ट हे दूर होतात. ह्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणा ह्या भगवान विष्णूंच्या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी विष्णुसहस्त्र नामाचा पाठ करा. मित्रांनो ज्यांना पाठ करणे शक्य नसेल त्यांनी अगदी श्रवण केले तरी चालते.

आर्थिक परिस्थती सुधारण्यासाठी आपण भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची देखील पूजा आपण अवश्य करा जेणेकरून आपल्याला धनप्राप्तीचे योग जुळून येतात. मित्रांनो मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपण सायंकाळी तुळशीजवळ जाऊन मनोभावे तेलाचा किंवा तुपाचा एक दिवा अवश्य प्रज्वलित करावा. तूप हे गाईचे असेल तर उत्तमच परंतु जर गाईचे तूप नसेल तर इतर कोणत्याही तुपाचा दिवा लावण्यापूर्वी त्यात आपण चिमूटभर हळद टाकायला विसरू नका जेणेकरून तुपाचे शुद्धीकरण होते.

तुळस हि विष्णुप्रिया आहे आणि अशी तुळशीची केलेली पूजा हि घरात सुख समृद्धी निर्माण करते. मित्रांनो आजचे उपाय अगदी साधे सोपे उपाय आहेत आणि या दिवशी भगवान विष्णूंची केलेली पूजा हि आपल्याला सर्वोदयी फळ देतेच. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.