धार्मिक

१४ मे २०२१ शुक्रवार, अक्षय तृतीया गुपचूप ठेवा इथे चिमूटभर हळद

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो संपूर्ण वर्षात जे साडेतीन मुहूर्त येतात त्यापैकी एक अक्षय तृतीया जी ह्यावेळी १४ मे शुक्रवारच्या दिवशी अली आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीस अक्षय तृतीया असे म्हणतात आणि हि तिथी अत्यंत शुभ मानली जाते म्हणूनच अक्षय तृतीयेस खूप लोक विवाह, गृहप्रवेश, धार्मिक पाठ असे अनेक शुभ कामे ह्या दिवशी करताना दिसतात.

ह्या अक्षय तृतीयेस जी काही आपण कार्य करू ती अवश्य यशस्वी होतात सफल होतात. मित्रांनो आज आपण एक उपाय पाहणार आहोत जो माता लक्ष्मीची आपल्यावरती अस्सीम कृपा बारसवतो भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करतो. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला धन, ऐश्वर्य, वैभव आपल्याला प्राप्त होते. आणि भगवान श्री हरीच्या आशीर्वादाने घरात सुख समाधान आणि समृद्धी नांदते. चला आपण आपल्या आजच्या लेखात जाणून घेऊयात हा तोटका कसा करायचा आहे ते.

हा उपाय आपण अगदी ह्या दिवशी कधीही कोणत्याही वेळेला केला तरी चालेल म्हणजे सकाळी किंवा संध्यकाळी कधीही. ह्यासाठी आपण आपल्या घरातील जो ईशान्य कोपरा आहे म्हणजे पूर्व आणि उत्तर ह्यांच्या मधील कोपरा आपण निवडायचा आहे. ईशान्य दिशा हि देवांची दिशा मानली जाते. आणि म्हणूनच ह्या कोपाऱ्याची साफसफाई करावी. जमल्यास आपण पिवळ्या, लाल, गुलाबी अश्या रंगाची वस्त्रे आपण परिधान करावीत. काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करू नये.

ईशान्य कोपऱ्यातील साफ केलेल्या जागी आपण एक पाट ठेवायचा आहे त्या पाटावर एक कापड अंथरायचे आहे आणि त्यावर आपण हळदीच्या साहाय्याने आपण २ अष्टकमळ काढायचे आहेत. मित्रांनो विष्णुपुराणानुसार अष्टकमळ म्हणजे साक्षात लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे. भगवान विष्णूंना हि अष्टकमळ अत्यंत प्रिय असतात. त्याचा बरोबर मध्यभागी थोडे कुंकू लावायचे आहे, त्यातील आपल्या डाव्या हाताला काढलेल्या अष्टकमळावरती श्री हारींची फोटो ठेवा. आणि उजव्या हाताला असलेल्या अष्टकमळावरती आपण माता लक्ष्मीचा फोटो आपण ठेवायचा आहे.

मित्रांनो त्यानंतर आपण ए तुपाचा दिवा तिथे लावायचा आहे व त्या तुपाच्या दिव्यात थोडी हळद आपण टाकायला विसरू नका. एक अगरबत्ती लावायची आहे. आणि पिवळ्या रंगाची फळे आपण प्रसाद म्हणून तिथे ठेवायची आहेत. गहू हरभऱ्याची भिजवलेली डाळ आपण नैवैद्य म्हणून अर्पण करू शकता. हा नैवेद्य ठेवल्यावर त्यावर एक तुळशीपत्र पालथे त्यावर घालायला विसरू नका. त्यानंतर आपण ह्या दोन मंत्रांचे उच्चारण करायचे आहे.

पहिला मंत्र आहे भगवान श्री हार विष्णूंसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय ! आणि माता लक्ष्मीचा ओम श्रीम नमः ! ह्या दोन्ही मंत्राचा जप १०८ वेळा प्रेत्येकी करणार आहोत. त्यानतंर आपण आरती ओवाळायची आहे व त्यानंतर आपण स्वतःला हळदी कुंकू नि तिलक करून घ्याचे आहे. त्यानंतर आपण हात जोडून आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या त्यांच्यासमोर सांगायच्या आहेत. मित्रांनो मनोभावे प्रार्थना करा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट