धार्मिक

१५ फेब्रुवारी माघ मास गणेश जयंती बाप्पांना अर्पण करा हि एक वस्तू .

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो उद्या म्हणजे १५ फेब्रुवारी च्या दिवशी पौराणीक मान्यतेनुसार शुक्ल महिन्यात गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि पूर्ण विश्वावर गणेशलहरी सर्वप्रथम आल्या तो दिवस म्हणजे माग शुक्ल चतुर्थी. मित्रांनो महादेव आणि देवी पार्वतीचे पुत्र गणेश हे प्रथमपूजनीय मानले गेले आहे. आपल्या कडे कोणतेही शुभ कार्य असो त्याच्या सुरवातीला गणपतीची पूजा केली जाते. या तिथीला गणपतीच्या चतुर्थीच्या दिवसाचे महत्वव किती तरी पटीने जास्त असते. मित्रांनो गणेश चतुर्थीला विनायक चतुर्थी देखील मानले जाते. ह्या वर्षीचे विनायक चतुर्थी उद्या सोमवारी १५ फेब्रुवारीला आली आहे.

विनायक चतुर्थी प्रारंभ हि १५ फेब्रुवारी सकाळी प्रातःकाली १:५८ मिनिटांनी सुरु होते आहे आणि चतुर्थी समाप्त होत आहे १६ फेब्रुवारी पहाटे ३:३६ मिनिटांनी. मित्रांनो ह्या विनायक चतुर्थीच्या दिवशी केली जाणारी गणेशांची पूजा अत्यधिक लाभदायक ठरते. आपल्या कडे भद्रपतामाध्ये गणेश जयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. भाद्रपत मधील गणेश जयंती निमीत्त पूजा केल्यानंतर आपण उकीडीच्या मोदकाचा नैवद्य दाखवला जातो. तर माघे गणेश जयन्तीमध्ये तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो म्हणूनच मागील गणेश जयंती तिलकुंद गणेश जयंती म्हणून देखील ओळखली जाते. अग्निपुराणामध्ये ह्या तिलकुंद चतुर्थी चे महत्व सांगितले आहे म्हणतात कि मोक्षप्राप्तीसाठी ह्या चतुर्थीला लोक व्रत करतात. ह्या दिवशी गणेशजींची पूजा अगदी भक्ती भावाने केल्याने आपल्याला गणेशजींचा आशीर्वाद वर्षभर आपल्या कायम सोबत राहतो आपल्यावर कोणतेही संकटे येऊन देत नाही.

मित्रांनो ह्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून अंघोळ करून देवघरामध्ये एक चौरंग घेऊन त्यावर गणेशजींची स्थापना करायची आहे. त्यानंतर गणेशजींना प्रिय असलेली जास्वंदीची फुले आपण गणेशजींना अर्पण करायची आहेत. त्यानंतर अथर्वशीर्षाचे वाचन करावे. व त्यानंतर पूजा झाल्यानंतर गणेशजींना तिळाच्या लाडवाचा नैवैद्य दाखवावा मित्रांनो तुमचे एखादे काम पूर्ण होत नसेल किंवा त्यामध्ये अडचणी येत असतील तर त्या अडचणी आपण गणेशजींना बोलून दाखवायच्या आहेत. आपले कार्य पूर्ण करण्यासाठी आपण त्यांना मागणे घालावे. गणपती बाप्पा हे विघ्णहर्ता आहेत ते सर्वांचे सर्व काही दुःख निवारण करतात. मित्रांनो ह्या गणपती जयंतीला तुम्ही देखील गणेशजींची मनोभावे पूजा अर्चना करा. भक्तिभावाने पूजा करा तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद15

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट