धार्मिक

१८ ऑगस्ट पुत्रदा एकादशी, हा मंत्र म्हणा १०८ वेळा सर्व इच्छा होतील पूर्ण

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो १८ ऑगस्ट रोजी पुत्रदा एकादशी अली आहे. श्रावण महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. मित्रांनो पुत्रदा एकादशीचे महत्वव ह्याचे व्रत केल्याने आपल्याला कोणते कोणते फायदे होतात कोणत्या नियमांचे पालन करायचे ह्या सर्वांची माहिती आपण आपल्या आजच्या लेखात घेणार आहोत. एकादशीचे व्रत जी व्यक्ती ठेवते तिच्या मनाची चंचलता कमी होते. मन स्थिर बनते.

घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे, तसेच आपल्या घरात नेहमी धन यावे असे वाटत असेल तर आपण हे व्रत अवश्य करावे. ज्यांना मनोरोग आहेत अश्या लोकांनी देखील हे व्रत अवश्य करावे. पुत्रदा एकादशी बद्दल बोलायचं म्हटलं तर ज्यांना मुलबाळ होण्यामध्ये समस्या आहेत अश्या सर्व समस्यांवर निवारण करणारे हे अशे व्रत आहे. मित्रांनो श्रवण महिन्यात जी पुत्रदा एकादशी येते ती अत्यंत फलदायी असते.

हे व्रत दोन पद्धतीने आपण करू शकता एक म्हणजे निर्जल व्रत ज्यामध्ये आपण काही न खाता पिता आपण व्रत करायचे आणि दुसरे म्हणजे फलाहार व्रत फक्त फळे खाऊन करायचे व्रत जे लोक एकदम स्वस्थ व तंदुरुस्त आहेत त्यांनीच निर्जल व्रत करावे अन्यथा बाकीच्या लोकांनी फलाहार व्रत केले तरी चालेल. ज्यांना ह्या दिवशी संतान प्राप्तीची इच्छा आहे अश्यानी ह्या दीवशी भगवान श्री हरी विष्णूंची उपासना करावी. मुलेबाळे असतील तर त्याचे कल्याण व्हावे असे वाटत असेल तर आपण त्यासाठी सकाळी लवकर उठून आणि पतिपत्नीने एकत्रितपणे भगवान विष्णूंची उपासना नक्की करा.

त्यांना आपण पिवळ्या रंगाची फळे, फुले अर्पण करावीत तसेच आपण त्यांना तुळसीची पाने मंजुळा आपण अर्पण करावीत. अशी पूजा केल्यानंतर आपण संतान प्राप्तीसाठी तसेच ज्यांना संतान कल्याणासाठी ह्या संतान गोपाळ मंत्राचा जप आपण १०८ वेळा करायचा आहे ह्या जपाची ताकद ह्या दिवशी जप केल्याने आणखी वाढते. हा मंत्र आहे “ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं देवकीसुत गोविन्द वासुदेव जगत्पते देहि मे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गतः ” मित्रांनो असा मंत्र आपण जप करा आणि ह्या मंत्राचा जप करून झाल्यानंतर आपण भगवान श्री विष्णूंना नैवैद्य अवश्य दाखवा.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट