धार्मिक

२० जुलै मंगळवारी आषाढी एकादशी करा हे उपाय, सुख समृद्धी व धन येईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण आषाढी एकादशी दिवशी केल्या जाणाऱ्या व्रत पूजा व उपायांबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्रात आषाढी एकादशीला एक वेगळेच अनन्यसाधारण महत्वव आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला महाएकदाशी म्हणतात. आषाढी एकादशी हे भगवान विष्णूंचे व्रत आहे, ह्या एकादशी दिवशी विष्णुरूपी विठ्ठलाची प्रार्थना केली जाते. ह्या वेळी आषाढी एकादशी २० जुलै मंगळवारी अली आहे.

वर्षभरातील मोठ्या एकादशीमध्ये हि एक एकादशी मानली जाते ह्या आषाढी एकादशी पासून चातुर्मास सुरु होतो, ह्या काळात देव निद्रेस जातात. ह्या एकादशीला देव शयनी एकादशी देखील म्हणतात. तर मित्रांनो ह्या वर्षी हि एकादशी २० जुलै मंगळवारी दिवशी आहे. ह्या दिवसाचा शुभ मुहूर्त हा १९ जुलै ला ९:५९ मिनीटांनी सुरु होते व २० जुलै २०२१ रोजी सायंकाळी ७:१७ वेळी संपते. मित्रांनो एकादशी व्रत समाप्तीला पारण असे म्हणतात.

आपण ह्या दिवशी व्रत करावे ह्या दिवशी व्रत केल्याने आपली सर्व पापे धुतली जातात अशी मान्यता आहे. जर आपल्याला ह्या दिवशी व्रत करणे शक्य नसेल तर आपण ह्या दिवशी काही छोटे उपाय करू शकता जेणेकरून तुम्हाला आषाढी एकादशीचे फळ प्राप्त होईल. आषाढी एकादशीला भगवान विष्णूंना पांढुरंगाला केशर मिसळलेल्या दुधाने अभिषेक घालावा ह्यामुळे आपली सर्व मनोकामना पूर्ण होतात.

ह्या दिवशी आपण ब्राह्ममुहूर्तावर उठून सकाळी स्नान करून झाल्यानंतर आपण सर्वप्रथम सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा. तसेच ह्या दिवशी धनवृद्धीसाठी आपण पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन खीर किंवा कोणतीही पांढऱ्या मिठाईचा नैवैद्य दाखवावा व नैवेद्यात एक तुळशीचे पान ठेवण्यास विसरू नये. ह्यामुळे विष्णू प्रसन्न होतात. ह्या दिवशी आपण पांडुरंगाला नारळ व बदाम अर्पण करावेत त्यामुळे आपल्या कामात येणाऱ्या सर्व बाधा अडचणी दूर होतात.

ह्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत. एकादशीच्या दिवशी आपण तुळशीसमोर संध्यकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि दिवा लावल्यानंतर ओम वासुदेवाय नमः ! ह्या मंत्राचा जप ११ वेळा करत आपण तुळशीला प्रदिक्षणा घालाव्यात. असे केल्याने घरात सुख शान्ति राहते, आणि आपल्या घरात येणारी संकटे टळतात. ह्या एकादशी दिवशी दक्षिणावर शंखामध्ये पाणी भरून त्या पाण्याने आपण विष्णूंचा अभिषेक करावा. असे केल्याने धनवृद्धी होते.

ह्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावावं असे म्हणतात कि पिंपळाच्या झाडात श्री हरी विष्णूंचा वास असतो. अश्या पद्दतीने आपण भगवान विष्णूनंची पूजा आराधना करून आपण आशीर्वाद प्राप्त करा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट