धार्मिक

२३ नोव्हेंबर मंगळवारी अंगारकी चतुर्थी करा अश्या पद्दतीने पूजा.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो २३ नोवेंबर मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. हि अंगारकी अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करावे श्री गणेशांची पूजा कश्या रीतीने करावी अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो संकष्टी चतुर्थी हा भगवान गणेश चा उपासनेचा दिवस ह्या दिवशी आपण दिवसभर उपवास करून चंद्रदयादिवशी गणपती बाप्पांची पूजा करून चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडला जातो.

जी व्यक्ती अंगारकी संकष्टी चतुर्थी चे व्रत करणार आहे तिने संपूर्ण दिवसभर कोणत्याही प्रकारच्या तामसिक आहाराचे सेवन करू नये. ह्या दिवशी आपण काळे तीळ पाण्यात टाकून अंघोळ करा. जर गरज भासली तर उपवासाला चालणारे पदार्थ आपण खाऊ शकता. आपला जो उद्योगधंदा आहे जे काम आहे ते मात्र नित्यनियाने करायचे आहे त्यामध्ये खंड पडता कामा नये. मित्रांनो रात्री वेळ वाटली तर आपण अंघोळ करू शकता आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पांचे पूजन आपण करायचे आहे.

पूजेसाठी आपण एक पाठ घ्यावा पाटावरती गव्ह्हाची किंवा तांदळाची रास करावी त्यावरती पाण्याने ठेवलेला तांब्या कलश ठेवावा, कलशाच्या बोहती आपण दोन वस्त्रे गुंडाळावीत त्यावर ताम्हण ठेवून त्यात गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करावी. आपण गणपती बाप्पांच्या कोणत्याही धातूंची मूर्ती किंवा तस्वीर आपण वापरू शकता. त्यानंतर आपण बाप्पांची विधिपूर्वक पूजा करणार आहोत. जी व्यक्ती पूजेला बसत आहे त्यांनी शकयतो लाल रंगाची वस्त्रे परिधान करावीत.

आपण गणपती बाप्पाना जे गंध आपण लावणार आहोत अक्षदा, फुले, वस्त्र हे सर्व अर्पण करणार आहोत हे सर्व तांबड्या रंगाचे असावे. गंध लावताना लभोधराय नमः असे नक्की म्हणा अक्षदा अर्पण करताना कामरूपाय नमः असे म्हणायचं आहे तर फुले अर्पण करताना सिद्धिप्रदाय नमः असे म्हणायचं आहे. तसेच फळे अर्पण करताना सर्वार्थसिद्धीदाय नमः वस्त्रे अर्पण करताना शिवप्रियाय नमः उपवस्त्र अर्पण करताना गणधिपाय नमः धूप लावताना गजमुखाय नमः दिवा लावताना मूषकवाहनाय नमः असे सर्व मंत्र आपण म्हणायचे आहेत. ज्यांना शक्य नाही त्यांनी सर्व तसेच न मंत्र म्हणता देखील अर्पण करू शकता.

अश्या प्रकारे पूजन करून झाल्यानंतर आपण २१ उकडीचे मोदक जे आहेत त्यांचा नैवद्य आपण अवश्य दखवावा. जेव्हा पूजा संपन्न होईल तेव्हा आपण एक ममाळ ओम गं गणपतये नमः ह्या महामंत्राचा जप आपण अवश्य करा त्यानंतर मनोभावे हात जोडून बाप्पांना आपल्या मानतील जे काही मागणे आहे ते सर्व मागावे. ते झालं कि आपण आरती करावी आरतीत कापूर नक्की वापरावा.

त्यानंतर आपण चंद्रदर्शन करायचे आहे, हे करताना आपण चंद्राला अर्घ्य वाहू शकता थोडे फुले अक्षदा देखील वाहायचा आहेत. जर तुम्हाला चंद्र दिसत नसेल तर घरातच एक पाट मांडून त्यावर चंद्र काढू शकता व त्याची पूजा आपण करू शकता. अश्या प्रकारे आपण चंद्राची पूजा करत असताना रोहिणीनाथय नमः असे बोलून चंद्रास नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर आपण आपला उपवास गोड पदार्थ खाऊन आपण सोडायचा आहे. चंद्र ग्रहण हा ९:०५ मिनीटांनी होत आहे.

त्यानंतर आपण उत्तर पूजा करून आपण गणपती बाप्पांची मूर्ती आपण थोडीशी हलवून आपण मूळ जागी ठेवून द्याची आहे. उत्तर पूजा म्हणजे जेवण झाल्यानंतर आपण गणपतीची अक्षदा वाहून पूजा करायची आहे. व नंतर आपण त्यांना आपल्याकडून काही चूक भूल झाली असेल तर त्यांना माफी मागायची आहे. त्यानंतर जे धान्य आपण पूजेत वापरले होते ते आपण पशुपक्ष्यांना टाकू शकता किंवा आपल्या घरातील धान्यात देखील आपण ते टाकू शकता.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट