धार्मिक

२५ फेब्रुवारी: गुरूपुष्य योग, करा हा १ महाउपाय मिळेल १०० पटीने फळ.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो नक्षत्रांचा राजा मानला जाणारा पुष्य नक्षत्र जो कि सुख, समृद्धी, धन प्रदान करणारा हा अत्यंत प्रभावशाली अश्या गुरुपुष्य योगाबद्दल आपण कोणते उपाय करायचे ज्यामुळे आपले नशीब पालटेल आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मित्रांनो उद्या २५ फेब्रुवारी गुरुवारी हा पुष्यामृत मुहूर्त आला आहे आणि ह्या दिवशी सर्व कामे केलेली फळास जातात. एकूण २८ नक्षत्र आहेत आणि पुष्य नक्षत्र हे त्यातील ८ व्या स्थानावर आहे. मृगवेदामध्ये पुष्यनक्षत्रास वृद्धीकरता सुख समृद्धी दाता म्हणले गेले आहे. गुरुपुष्यामृत योगासोबतच सर्वार्थसिद्धी योग आणि अमृतसिद्धीयोग हे दोन योग्य देखील आले आहेत.

मित्रांनो गुरुपुष्यामृत योग्य हा सकाळी ६:५० मिनीटांनी लागत असून ते १:१७ मिनिटापर्यंत तो आहे. पुष्य नक्षत्र हे देवतांद्वारे देखील पूजनीय आहे आणि त्यामुळे त्याचे महत्व हे अनंत पटीत वाढीत आहे. त्यामुळे ह्यादरम्यान केलेले उपाय हैवर देवतांचा अश्रीवाद व नक्षत्रांची अनुकूलता राहते. त्यामुळे ह्या दरम्यान केलेलं कार्य हे सिद्धीस जाते फळास जाते. ह्या नक्षत्रामध्ये माता लक्ष्मीचे देखील आगमन झाले होते. म्हणून ह्या दरम्यान केलेल्या उपायांवर माता लक्ष्मीची कृपादृष्टी नेहमी राहते. हा योग गुरुवारी येत असल्यामुळे भगवान श्री नारायणाची विधिवत पूजा करून त्यांना आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याचबरोबर तुम्ही माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे आणि हि पूजा करत असताना आपण एक मंत्राचा जाप करायचा आहे तो म्हणजे ” ओम श्री ह्ररी दारिद्र्य विनाशिन्ये धनधान्य समृद्धी देही देही नमः…!! मंत्राचा जाप तुम्ही १०८ वेळा करायचा आहे. ह्या मंत्राचा जाप केल्याने आपले सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊन माता लक्ष्मी व श्री हरी ह्यांची कृपा आपल्यावर सदैव राहील व तुमची सर्व कामे यशस्वीरीत्या पार पडतील.

ह्या दिवशी आपण विष्णुसहस्त्र वाचन किंवा श्रवण करावे. त्यामुळे माता लक्ष्मी ची कृपा होईल व आपल्या सर्व अडीअडचणी दूर होतील. ह्या दिवशी गृहप्रवेश, मालमत्ता खरेदी सोने खरेदी व इतर आपली महत्वाची कमी करण्यासाठी हा दिवस सर्वात शुभ आहे. तसेच ह्या दिवशी गुरुमंत्र नामःस्मरण केल्यास अत्यंत लाभ होतो. गुरूपुष्य धार्मिक पुस्तके वाचायला सुरवात करा. मनःशांतीसाठी हे सर्व उपायांची सुरवात आपण ह्यादिवशीच करावी. तसेच असे मानले जाते कि ह्या दिवशी खरेदी केलेले सोने हे अक्षय राहते त्यात वृद्धी होते. तसेच ह्या दिवशी केले जाणारे उपाय खूप फलदायी ठरतो. असाच एक उपाय आपण पाहुयात.

ह्या दिवशी सकाळी अंघोळ करून सूर्य देवतेला जल अर्पण करावे ह्या मुळे आपले कामातील यश मानसम्मान व प्रतिष्ठा वाढते. तसेच एखाद्याला नोकरी लागत नसेल तर ह्या दिवसापासून तुम्ही सूर्याला जल अर्पण देणे सुरु करा. तुम्हाला निश्चितच यश मिळेल. तसेच विवाह जमण्यात अडचणी येत असतील तर ह्या दिवसापासून तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात हळद टाकून ते पाणी सूर्याला अर्पण करायला सुरवात करा तुमच्या अडचणी संपतील. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट