धार्मिक

२७ एप्रिल चैत्री पौर्णिमा, मंगळवार, हनुमान जयंती, देवघरात ठेवा हा नैवद्य.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो २७ एप्रिल रोजी मंगळवारच्या दिवशी हनूमान जयंती आहे कारण ह्याच दिवशी पौर्णिमा देखील आहे आणि ह्या दिवशी मंगळवार श्री हनुमानांचा वार हा एक चांगला संयोग जुळून आला आहे. ह्या दिवशी आपण आपल्या देवघरात एक विशेष नेवैद्य ठेवायला पाहिजे जो अत्यंत प्रिय आहे. हनुमानांची आपल्या घरातील देवघरात जरी मूर्ती किंवा फोटो नसेल तरी काही हरकत नाही परंतु आपण आपल्या देवघरात हा नेवैद्य अवश्य ठेवला पाहिजे ह्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतात. घरातील गरिबी दूर होते, घरातील कटकटी, दोष, पीडा हहा दूर होतात. तर मित्रांनो हा हनुमानांचा दिवस खूप महत्वाचा आणि मोठा मानला जातो. ह्या दिवशी आपण घरात सकाळी लवकर उठून घरात देवपूजा करून देवासमोर बसून आपण हनुमान चालीसा चा पाठ अवश्य करावा.

ह्यामुळे बजरंगबलीची कृपादृष्टी आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती होते. बजरंबली हे अत्यंत लवकर प्रसन्न होतात म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण आज एक विशेष नेवैद्य आपण हनुमानांना दाखवणार आहोत. तो म्हणजे आपण आपल्या देवघरात गूळ आणि चणे ठेवायचे आहेत. म्हणजेच फुटाणे हे आपण थोडे घेऊन व थोडासा गूळ हे एकत्र वाटीमध्ये घेऊन त्यातील गूळ बारीक करून ते फुटाणे त्यात मिक्स करून ती वाटी व एक पाण्याचा ग्लास आपण देवघरासमोर ठेवायचा आहे. त्यावर तुळशी पत्र देखील आपण ठेवायचे आहे आणि हा असा नेवैद्य आपण हनुमानांना दाखवायचा आहे. आणि हाथ जोडून आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी आपण हनुमानांना सांगायच्या आहेत व बोलायचे आहे कि आपल्या सर्व संकटांपासून आपले रक्षण कर. आणि त्यानंतर आपण तो नैवैद्य तिथेच ठेवून द्याचे आहे. आणि त्यानंतर तेच चणे आणि गूळ २ तासाने आपण आपल्या घरातील सर्व लोकांना प्रसाद म्हणून वाटायचा आहे.

आता तुम्ही हे केव्हा करू शकता तर मित्रांनो तुम्ही हे दिवसभरात केव्हाही करू शकता म्हणजे सकाळी दुपारी किंवा सायंकाळी केव्हाही करू शकता. तुम्हाला जेव्हा हि वेळ मिळेल तेव्हा तुम्ही गूळ आणि चणे हे आपण देवपूजा करून देवघरात ठेवायचे आहेत. चणे म्हणजे जे आपण भाजी मध्ये वापरतो ते नव्हे तर ते काळ्या रंगाचे असतात फुटाणे ते पिवळ्या रंगाचे देखील नाहीत. तर अश्या पद्दतीने आपण हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी हा उपाय नक्की करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, तुमची सर्व अडचणीतून सुटका होईल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट