नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे असेल कि वर्षातील सर्वात मोठी अंगारक चतुर्थी हि २७ जुलै २०२१ मंगळवार ह्या दिवशी येत आहे. मित्रांनो मंगळवार हा दिवस गणपतीचा दिवस मानला जातो आणि त्यात चतुर्थी म्हणजे ह्या दिवसाची मान्यता जास्त असते. खूप लोक ह्या दिवशी व्रत देखील करतात. काही लोक व्रत करतात तर काही लोकांना ते जमत नाही परंतु मित्रांनो ह्या दिवशी जमल्यास नक्की उपवास करावा हा उपवास आपण रात्री सोडता येतो. ह्या दिवशी आपण व्रत रात्री सोडता येते.
मित्रांनो ह्या दिवशी व्रत जरी तुम्हाला करायला जमले नाही तरी आपण ह्या दिवशी हा नैवैद्य नक्की दाखवावा सकाळी हा नैवैद्य दाखवणे शक्य नसेल कारण खूप लोकांचे उपवास असतात परंतु संध्यकाळी अंगारक संकष्टी चतुर्थी च्या दिवशी मात्र हा नैवैद्य आपण अवश्य दाखवावा. तुमचे सर्व विघ्न दूर होतील आणि गणेश प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील.
तर हा नैवेद्य कोणता करावा, मित्रांनो ह्या दिवशी आपण गोड काही तरी म्हणजे पुरणपोळी किंवा मोदक, खीर किंवा अगदी काही ना जमल्यास आपण गुळाचा खडा ठेवला तरी चालतो. मित्रांनो ह्या दिवशी मोदक करणार असाल तर त्यांची संख्या हि २१ असायला हवी. मोदक हे आपण कोणत्याही प्रकारचे केले तरी चालतात मग ते उकडीचे असो किंवा साखरेचे असोत कोणतेही केले तरी चालतात.
फक्त २१ मोदक करा आणि तो आपण जेही भाजी चपाती केली असेल त्या सोबत ह्या मोदकाचा नैवैद्य आपण गणपती बाप्पांना दाखवा. आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या सर्व काही पूर्ण होतील. आपली सर्व दुःख संकटे ह्यापासून मुक्ती होते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




