धार्मिक

२७ जून रविवार संकष्टी चतुर्थी बाप्पला वाहा हे एक फुल, इच्छा ताबड्तोक पूर्ण होईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो उद्या म्हणजेच २७ जून २०२१ आणि आली जेष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी, ह्या दिवशी आपण गणपती बाप्पांचे पूजन नक्की करा, त्यांच्या पूजेमध्ये कोणत्या गोष्टींचा वापर करावा, त्यांना नैवैद्य काय करावा. संकष्टी चतुर्थीस आपण कोणते उपाय करायचे आहे ह्याबद्दल माहिती आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

मित्रांनो गणपती बाप्पा प्रथमेश आहेत त्यांना देवांमध्ये पहिले स्थान आहे. आणि गणपती बाप्पांची ह्या दिवशी काही उपाय केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आपल्यावरती काही संकटे असतील दूर होतात. मित्रांनो गणपती बाप्पाना जास्वंदीचे फुले व दुर्वा अवश्य अर्पण करा कारण ते त्यांना प्रिय आहेत. तर अश्या २१ दुर्वांची पेंडी आपण गणपती बाप्पाना अर्पण करायची आहे, हि दुर्वा तोडताना आपण ओम गण गणपतये नमः ! ह्या मंत्राचा जप करा. २१ वेळा ह्या मंत्राचा जप होईल. आणि नंतर त्या आपण श्री गणेशांना वाहायचा आहेत. सोबतच जास्वंदीचे फुले देखील वाहायची आहेत.

नैवैद्य म्हणून आपण उकडीचे किंवा साधे मोदक आपण अवश्य करा जर हा शक्य नसेल तर अगदी गुळाचा खडा ठेवला तरी चालेल. हा नैवैद्य दाखवल्यानंतर आपण ह्या प्रसादाचे सेवन आपल्या घरचांसोबत एकत्र करायचे आहे. ह्यामुळे आपल्या घरातील लोकांमध्ये प्रेमभाव वृध्न्गीत होतो. जर कोणाच्या घरात तरुण मुलामुलींचे विवाह जमण्यात काही बाधा येत असतील तर अश्या वेळी आपण विवाह कार्यमधील विघ्न दूर करण्यासाठी श्री गणेशांचे पूजन करा आणि पूजन संपन्न होत असताना ओम वक्रतुंडया हम ! ह्या मंत्राचा जप आपण जास्तीत जास्त वेळा करा.

शत्रूंना शांत करण्यासाठी आपण कडुनिंबाच्या लाकडापासून बनविलेल्या गणेश मूर्ती असतात त्या गणेश मूर्तींचे पूजन आपण अवश्य करा. ह्यामुळे शत्रू शांत होतात व त्यांना वश करता येते. सोबतच जर तुमच्यकडे जर हि मूर्ती नसेल तर आपण हरिद्रा पिस्टि गणपतीचे पूजन करणे हि मूर्ती भारतात पश्चिम बंगाल मध्ये श्री बगलामुखी गणेश आहेत अश्या गणपतीचे पूजन केल्याने आपल्याला शत्रूवर विजय प्राप्त करता येतो. फक्त आपण हे पूजन केल्यानंतर आपण आपली जी इच्छा आहे ते आपण बोलून दाखवायचे आहे.

घरातील गरिबी, दारिद्र्यता तसेच जर तुमच्यकडे पैसा तुम्ही मेहनत करता तितका येत नसेल तर भगवान श्री गणेशाच्या अर्ककाष्ट प्रतिमेचे पूजन करा त्यामुळे आपल्या घरात गरिबी दूर होते. अर्क म्हणजे रुई व काष्ट म्हणजे लाकूड अश्या पांढऱ्या रुईच्या मुळांमध्ये हि गणेशांची मूर्ती काही झाडांमध्ये निर्मित होते तसेच ह्या रुईच्या लाकडापासून देखील काही प्रतिमा बनवल्या जातात. त्याचे पूजन केले तरी चालेल.

ज्यांना कोणत्याही कामात यश प्राप्त करायचे असेल अश्या व्यक्तींनी कुंभाराच्या घरी जाऊन तो ज्या मातीची मडकी बनवतो त्या मातीपासून एक गणेशांची मूर्ती बनवा व त्या मूर्तीची संकष्टी चतुर्थी दिवशी पूजा करा व त्यानंतर १०१ माळा ॐ ह्रीं ग्रीं ह्रीं ह्या मंत्राचा जप करा. आपल्या सर्व कामात आपल्याला यश प्राप्ती होईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट