धार्मिक

२८ जानेवारी शुक्रवार षटतिला एकादशी सर्व इच्छा होतील पूर्ण फक्त गाईला खाऊ घाला हि एक वस्तू

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. २८ जानेवारी २०२२ शुक्रवारचा दिवस आणि ह्या दिवशी आलेली आहे षटतिला एकादशी. ह्या एकादशीचा प्रारंभ २७ जानेवारी गुरुवारी रात्री २:१६ मिनिटांनी सुरु होत आहे आणि ह्याची सांगता शुक्रवारी रात्री ११:३६ मिनीटांनी होईल. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते.

म्हणून ह्या दिवशी आपण उपवास नक्की करावा. मित्रांनो आपण ह्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा नक्की करा आणि आपण त्या पूजेत त्यांना नैवैद्य म्हणून आपण तिळाचे पदार्थ आपण नक्की अर्पण करा. मग ते तिळाचे लाडू किंवा वडी असेल त्याचबरोबर आपण पिवळ्या रंगाची फुले तसेच मिठाई आपण अर्पण करावी.

भगवान नारायण ह्या संपूर्ण सृष्टीचे पालनहार आणि संपूर्ण सृष्टीचे संचालक आहेत. ह्या दिवशी आपण चुकूनही मसूर डाळीचे सेवन तांदळाचे सेवन आपण करू नका. ह्या दिवशी आपण गोमातेला आपल्या क्षमतेनुसार काही सेवा आपण नक्की करा. ह्या दिवशी आपण गाईला एक भाकरी व त्यावर थोडासा गूळ व तीळ ठेवून आपण उजव्या हाताने खाऊ घालावी गाईच्या अंगावरून आपण हाथ नक्की फिरवावा. आणि गोमातेसमोर आपण हात जोडून आपली जी काही इच्छा असेल ती आपण सांगावी

हिंदू धर्मशास्त्रानुसार गाईमध्ये तब्ब्ल ३३ कोटी देवीदेवतांचा वास असतो. एकादशी तिथीस गोमातेला भाकरी खाऊ घातल्याने आणि विशेषतः ह्या षटतिला एकादशीला तीळ भाकरी खाऊ घातल्याने आपल्या जीवनातील सर्व पितृदोष नाहीसे होतात. आणि पितृदोष नाहीसे झाले कि आपल्या जीवनातील सर्व संकटे बाधा दूर होतात प्रगती होते.

ज्यांना संतान नाहीए ज्यांना मुलबाळ नाहीए त्यांना संतानप्राप्तीचे योग निर्माण होतात. घरात अशांती असेल किंवा भांडणे होत असतील तर असे सर्व शांत होते. मित्रांनो ह्या दिवशी गाईला जेव्हा आपण तीळ व भाकरी खाईला देत असताना आपण ओम नमो भागवते वासुदेवाय ह्या महामंत्राचा जप आपण करू शकता. ह्या दिवशी आपण गोमातेला असा भोग अर्पण केल्यानंतर आपण त्या दिवशी आपण एखाद्या कोणत्याही एखाद्या गरिबास आपण खाऊ घाला. अगदी पोटभर आपण त्याला खाऊ घाला अगदी जन्मोजन्मीची गोरगरीबी असेल ते ह्याने दूर होते. अकाल मृत्यूचे भय देखील राहत नाही.

मित्रांनो ह्या दिवशी आपण जितकी जास्त नारायणांची सेवा करता येईल तितकी जास्त आपण नारायणांची पूजा नक्की करा. आपल्या घराजवळील पिंपळाच्या झाडाखाली जाऊन एक दिवा लावा ह्यालाच दीपदान असे देखील म्हणले जाते हे आपण अवश्य करा. ह्या दिवशी आपण हात जोडून आपल्या पितरांना नमन करायचे आहे. पितृदेवस प्रार्थना करायची आहे कि आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लाभू दे. ह्यामुळे पितृदोष दूर होऊन घरात सुख समृद्धी येते.

आपल्या घराजवळ एखादे तळे असेल किंवा विहीर असेल तर आपण त्या ठिकाणी जाऊन देखील आपण पितृदोषातून मुक्ती मिळण्यासाठी दीपदान करू शकता. ह्यामुळे घरात आनंदमय वातावरण निर्माण होते. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट