नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, मित्रांनो २९ जुलै २०२२ पासून श्रवण महिन्याची सुरुवात होत आहे. चातुर्मासातील सर्वश्रेष्ठ महिना म्हणजे हा श्रावण महिना, आषाढी अमावस्या झाली कि व्रतवैकल्यानां सुरवात होते. ऊन पाऊसाचा खेळच जणू सुरु होतो. श्रावण महिना हा शिव शंकरांना समर्पित आहे.
त्यांच्यासाठी अनेक व्रत केली जातात उपवास केले जातात आणि भरपूर साधना देखील केली जाते अश्या ह्या पवित्र महिन्यात येणाऱ्या सात्विक व सकरात्मक ऊर्जेचे ग्रहण करण्यासाठी घरातून काही नकारात्मक ऊर्जा पहिली बाहेर काढली पाहिजे. ह्या गोष्टी घरातून बाहेर काढायला हव्यात श्रावण सुरु होण्याआधी. चला तर जाणून घेऊयात त्या कोणत्या वस्तू आहेत ते.
वास्तुशास्त्रानुसार घरातील वस्तूंचा आपल्या जीवनावर सकारात्मक व नाकारात्मक परिणाम होत असतो. घरातील प्रेत्येक वस्तूमध्ये तिची स्वतःची अशी ठराविक ऊर्जा असते आणि त्या उर्जेचाच आपल्या जीवनावर परिणाम होतो. म्हणून घरात तुटलेली फुटलेली तिजोरी जर घरात असेल तर ती पहिला घरातून बाहेर काढा नाहीतर घरात दरिद्रता येते. घरात फुटकी भांडी, चिरलेली भांडी ह्यातून देखील घरातून नाकारात्मक ऊर्जा बाहेर पडते जी आपल्याला हानी पोहचवते, घरातील पैसा अगदी पाण्यासारखा खर्च होतो, पैसे टिकत नाहीत.
देव्हाऱ्यात खंडित तुटलटलेले फुटलेली मूर्त्ती किंवा फोटो ठेवू नये. ह्यामुळे सुद्धा घरातील आर्थिक स्थिती खालावते म्हणून अश्या मूर्ती किंवा फोटो वाहत्या प्रवाहात सोडून द्याव्यात. व त्याजागी नवीन मूर्तीची स्थपणा करावी. घरात आपल्या भंगार किंवा इतर पसरा ठेवल्याने आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. ज्या गोष्टींची घरात गरज नाही त्या वस्तू घरातून लगेचच बाहेर काढाव्यात. छतावरील भंगार तुमच्या घरात दरिद्रता आणण्यास कारणीभूत ठरते.
श्रावण महिन्यात भगवान शिव शंकर आणि माता पार्वती ह्यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते, आर्थिक समस्या दूर होतात. श्रावण महिना शंकरांना प्रिय असण्याचे कारण म्हणजे, ह्या महिन्यातच शंकरांना प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीने खूप मोठे तप केले होते. श्रावणी महिन्यात केल्या जाणारया जलाभिषेकास, रुद्राभिषेक करण्यास फार महत्व आहे. जर शिवपूजन करणे शक्य नसेल तर फक्त एक बेलाचे पान जरी तुम्ही पिंडीवर वाहिले तरी तुम्हाला पूर्ण पूजेचे फळ मिळते.
त्याचबरोबर ह्या श्रावणात शिवप्रतिक असलेला रुद्राक्ष धारण करणे देखील खूप शुभ मानले जाते. तर मित्रांनो आजचा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर लाइक व शेयर नक्की करा. तसेच तुम्ही देखील महादेवांचे भक्त असाल तर कंमेंट मध्ये हर हर महादेव लिहण्यास विसरू नका.




