धार्मिक

३० डिसेंबर गुरुवार: सफला एकादशी, गरिबी,कर्ज,अडचणी,संकटे दूर करण्यासाठी करा हे उपाय.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो २०२१ सालातील अंतिम एकादशी ३० डिसेंबर दिवशी येत आहे, हिला सफला एकादशी ह्या नावाने ओळखले जाते ह्या एकादशीच्या नावातच आहे. हि सर्व कार्य यशस्वी करवते ती एकादशी म्हणजे सफला एकादशी, सर्वश्रेष्ठ ज्याप्रमाणे ग्रहांमध्ये चंद्रग्रह श्रेष्ठ, नागांमध्ये शेषनाग श्रेष्ठ, यज्ञांमध्ये अश्वमेध यज्ञ श्रेष्ठ पक्षांमद्ये गरुड श्रेष्ठ, देवतांमध्ये श्री हरी विष्णू श्रेष्ठ तसेच सर्व व्रतांमध्ये हि एकादशी हि सर्वश्रेष्ठ मानण्यात अली आहे.

ह्या एकादशीस भगवान श्री हरी विष्णूंची मनोभावे पूजा अवश्य करा, ह्या दिवशी व्रत करा आणि त्यासोबतच अत्यंत सोपे साधे व प्रभावशाली उपाय देखील करा. आपल्याला काही संकटे असतील अडचणी असतील काही दुःखे असतील त्याप्रमाणे आपण उपाय नक्की करून पहा.

भगवान विष्णूंच्या कृपेने आपल्या सर्व समस्या दूर होतील आपल्या काही खूप दिवसांपासून जर इच्छा असतील तर त्या सर्व इच्छांची पूर्ती नक्की होईल. मित्रांनो हे उपाय करताना काही छोट्या गोष्टींचे पालन अवश्य करा नाहीतर आपण केलेले उपाय यशस्वी होत नाहीत.

ह्या दिवशी आपण कोणाचीही निंदा करू नये मोठ्यांचा अपमान करू नये त्यांच्याशी आदराने बोलावे. स्त्रियांचा अपमान होईल असे कोणतेही शब्द बोलू नयेत. वाईट चिंतु नये, ह्या दिवशी गैरवर्तन टाळावे. ह्या दिवशी ज्यांच्या घरात गरिबी आहे त्यांनी भगवान श्री हरी विष्णूंच्या सोबत माता लक्ष्मीची देखील विशेष पूजा करावी . ह्या दिवशी आपण भगवान विष्णुंनसोबत माता लक्ष्मीच्या नामाचा जप करणे तसेच त्यांची आरती करावी.

ह्या दिवशी आपण गोरगरिबांना आपल्या सामर्थ्यानुसार आपल्या स्थितीनुसार आपण दानधर्म नक्की करा. ह्यामुळे आपल्या जीवनातील अडचणी संकटे नक्की दूर होतील. ह्या दिवशी आपण आपल्या घराच्या छतावर पिवळ्या रंगाचा ध्वज नक्की लावा घरातही तुम्ही हा ध्वज लावू शकता ह्यामुळे घरात सुख समृद्धीचे आगमन होते.

धार्मिक मान्यतेनुसार आपण घरात तुळशीचे रोप लावावे, तुळस हि भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तिला विष्णुप्रिया असे देखील म्हणले जाते. तिला हिंदुधर्मशास्त्राने मातेचा दर्जा दिलेला आहे. ह्या दिवशी तुळशीसमोर संध्याकाळच्या वेळी दिवा नक्की लावा. तसेच ज्यावेळी तुम्ही विष्णूंना नैवद्य दाखवलं त्या वेळी तुळशीपत्र त्यावर अवश्य ठेवा नाहीतर नैवैद्य भगवान विष्णू स्वीकारत नाहीत.

तुळशीचे रोपटे आपण आपल्या घराच्या पूर्वेला लावावे, तसेच घराच्या उत्तरं दिशेला आपण झेंडूच्या फुलांचे रोप लावावे हे अगदी शुभ मानले जाते. धर्मशास्त्रानुसार आवळ्याच्या रोपट्यात साक्षात विष्णू वास करतात म्हणून ह्या दिवशी आपण आवळ्याचे रोपटे देखील लावू शकता. पूजा करताना आपण ओम नमो भागवते वासुदेवाय ह्या महामंत्राचा १०८ वेळा जप करावा.

एखादी घरात आजारी व्यक्ती घरात असेल तिचा आजार बरा होत नाही तर अश्या आजारी व्यक्तीस आपण बरे करण्यासाठी आपण भगवान विष्णूंना काही फळे अर्पण करावीत आणि नंतर हीच फळे प्रसाद म्हणून त्या रोगी व्यक्तीस खाऊ घातल्यास ती व्यक्ती बरी होते.

मित्रांनो शक्यतो आपण पिवळ्या रंगाची फळे जि आहेत त्यांचा वापर आपण अवश्य करावा. उद्योगधंद्यात यश मिळत नसेल तर आपन ह्या दिवशी विष्णूसोबत माता लक्ष्मीची देखील पूजा करावी. माता लक्ष्मीला आपण सौफ म्हणजेच बडीशोप तसेच भगवान विष्णूंना खडीसाखरेचा भोग आपण अवश्य लावावा.

सोबतच आपण ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मी वासुदेवाय नमः। ह्या महमंत्राचा जप आपण अवश्य करावा तसेच ते बडीशोप आणि खडीसाखरेचा भोग आपण दररोज जेवण झाल्यानंतर प्रसाद म्हणून सेवन करावे, आपल्याला उद्योगधंद्यात अवश्य यश मिळेल. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट