धार्मिक

३० मे २०२२ सोमवारी अली आहे शनी जयंती, करून पहा हे ७ उपाय सर्व प्रकराची साडेसाती दूर होईल.

३० मे २०२२ रोजी आलेली आहे शनी जयंती, जरवर्षी वैशाख महिन्यातील कृष्णपक्षातील अमावस्याला शनी जयंती साजरी केली जाते. शनी देवांना भगवान शंकरांमुळे न्यायदेवतेचा अधिकार मिळाला आहे असे सांगण्यात येते. शनी देवांना प्रसन्न करण्यासाठी ह्यादिवशी काही विशेष पूजा अर्चना करण्यात येते. साडेसातीपासून मुक्ती मिळण्यासाठी शनिदेवांची आराधना करण्याची गरज असते. शनीच्या प्रकोपामुळे व्यवसायचे सुद्धा नुकसान होते आणि आणखी देखील जीवनात संकटे येतात.

शनी देव सूर्य देवांचे सुपुत्र आहेत, छायावेली ह्या त्यांचा माता आहेत. शनिजयंतीच्या दिवशी एक खास विशेष योग बनतो आहे, म्हणूनच तुम्ही केलेले उपायांचे फळ आपल्याला नक्कीच मिळेल. २९ मे ला दुपारी २:५४ मिनिटांनी अमावस्या सुरु होत आहे तर ती ३० मे ४:५९ मिनीटांनपर्यंत अमावस्या असणार आहे.

सूर्यदयानुसार शनी जयंती हि ३० मे दिवशी साजरी केली जाईल. ह्या दिवशी सुकर्मा योग आहे, तसेच सकाळी सर्वार्थसिद्धी योग देखील आहे. शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनिजयंतीच्या दिवशी व्रत करण्यात येते, त्यामुळे आपला शनी ग्रह मजबूत बनतो. त्याचबरोबर शनिजयंतीच्या दिवशी काही दान देखील करावे.

जसे कि काळे कपडे, काळे बूट चपला, काळे तीळ, काळे मसूर इत्यादी वस्तू दान करणे उत्तम मानण्यात येते. सूर्यदयापूर्वी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनी जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला मोहरीच्या तेलात लोखंडी खिळा अर्पण करा. पिंपळाच्या झाडाबोहोती कच्चा सूत सात वेळा गुंडाळून शनी मंत्राचा जप केल्याने शनी देव प्रसन्न होतात. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा, तसेच शनी चालीसेचे पिंपळाच्या झाडाखाली पठण करावे.

शनीची साडेसाती किंवा शनीची ढय्या चालू असेल तर शनीमंत्राचा जप नक्की करावा. मंत्र ह्या प्रमाणे आहे ॐ शं शनैश्चराय नमः ! आणखी एक मंत्र आहे तो म्हणजे ॐ प्रां प्रीं प्रों स: शनैश्चराय नमः ! ह्या मंत्राचा आपण १०८ वेळा जप करा असे केल्याने आपल्याला शनीच्या वाईट प्रभावापासून मुक्ती मिळते. तसेच आपली सर्व कामे देखील पूर्ण होतात. ह्यादिवशी तुम्ही काही खास उपाय देखील करू शकता.

शनिजयंतीच्या दिवशी पितळेच्या भांड्यात मोहरीचे तेल भरून घ्या व त्यात आपले प्रतिबिंब पहा, त्यानंतर आपण ते तेल गरजू व्यक्तीला किंवा मंदिरातील ब्रह्म्णाला दिले तरी चालेल. असे केल्याने देखील शनीचे आशीर्वाद मिळतात असे म्हण्टले जाते. मित्रांनो शनिदेवांना सर्वात सोपा प्रसन्न करण्याचा मार्ग म्हणजे आईवडिलांची सेवा करणे.

आई वडिलांचा अपमान करणाऱ्यांवर शनिदेव कधीही प्रसंन्न होत नाहीत. म्हणून आई वडिलांची सेवा करणाऱ्या व्यक्तीला शनी देव कधीही त्रास देत नाही हि गोष्ट देखील तितकीच खरी  आहे. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट