नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ, मित्रांनोगुरुवारच्या दिवशी आपण आपल्या पर्स किंवा पाकिटात एक हळकुंड आणि त्यासोबत अजून काही धनाशी संबंधित वस्तू नक्की ठेवा ह्या वस्तू ठेवण्यापूर्वी कोणता मंत्र म्हणावा आणि त्या मंत्राच्या साह्याने घरात सुख शांती कशी नांदू लागते ह्याची संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या लेखात पाहणार आहोत.
मित्रांनो गुरुवारचा दिवस देव बृहस्पतींचा दिवस मानला जातो आणि ज्या कोणी व्यक्तीवर देव बृहस्पतींची कृपा बरसते त्या व्यक्तीला अपार धनप्राप्ती नक्की होते. म्हणजेच धन वैभव पैसा त्या व्यक्तीच्या जीवनात नक्की येतो. मित्रांनो हा उपाय आपण विशेषकरून गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. अगदी शुक्ल किंवा कृष्ण पक्षातील कोणताही गुरुवार असेल तरी चालेल हा उपाय आपण अगदी कोणत्याही गुरुवारी करू शकता.
एकदा उपाय केल्यानंतर आपण हा उपाय पुन्हा पुढील येणारया गुरुवारी देखील करू शकता त्याचा प्रभाव त्यामुळे आणखी वाढतो. मित्रांनो हा उपाय देवगुरु बृहस्पतींना तर प्रसन्न करवतोच पण सोबतच देवीदेवतांचे जे कोशाध्यक्ष आहेत ते म्हणजे कुबेर महाराज तर हा वर कुबेर देवांचा देखील मानला जातो ह्या दिवशी केलेली बृहस्पतींची पूजा हि भगवान विष्णूंना देखील प्रसन्न करते.
मित्रांनो हा उपाय करण्यासाठी गुरुवारी सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नान करून घ्यावे स्वच्छ कपडे घालून आणि त्यानंतर आपण जी आपली नित्य देवपूजा करतो अगदी त्याचपद्धतीने देवपूजा करत असताना देवघरासमोर एक पाट घेऊन त्यावर आपण एक लाल रंगाचा कापड वापरावे. त्या कपड्यवरती एक साबूत हळकुंड ठेवा. तुमच्याकडे गोमती चक्र असतील तर ती गंगाजलाने धुवून ती आपण तिथे ठेवायची आहे जर आपल्याकडे कवडी असेल तर ती अवश्य ठेवावी त्यानंतर केशराच्या एक दोन काड्या आपण ठेवाव्या.
मित्रांनो ह्या सर्व वस्तू ह्या लक्ष्मीदायक समृद्धीकारक आहेत. ह्या वस्तू ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी लक्ष्मी नक्की धावत येते. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते. तर जितक्या वस्तू तुमच्याकडे असतील त्या सर्व वस्तू आन घ्याच्या आहेत. जर तुमच्याकडे कुबेरयंत्र असेल तांबे ह्या धातूपासून बनवलेले हे यंत्र आपण ह्या लाल रंगाच्या कपड्यावर आपण ठेवू शकता. ह्या सर्व वस्तूंची आपण हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे, आणि त्यानंतर आपण एक मंत्र सांगत आहोत त्या मंत्राचा जप आपण करायचा आहे.
ह्या मंत्रामुळे ह्या वस्तू भरीत करतो, देवतत्त्व आकृष्ट करण्याचे काम हा मंत्र करतो आणि हा मंत्र आहे ॐ बृं बृहस्पतये नमः। ह्या मंत्राचा १०८ वेळा म्हजेच एक माळ आपण जप करून हा लाल रंगाच्या कपड्यात ज्या वस्तू ठेवल्या आहेत त्या सर्व गुंडाळून आपण ह्या वस्तू आपल्या पाकिटात ठेवायच्या आहेत जेव्हा देखील आपण घराबाहेर पडाल तेव्हा ह्या सर्व वस्तू आपण आपल्या सोबत न्याच्या आहेत. आणि हे तुमच्या सोबत ठेवणे जमत नसेल तर आपण आपल्या तिजोरीत जिथे कुठे तुम्ही तुमचे पैसे ठेवत असाल तिथे आपण हे ठेवून द्यावे.
ज्या ठिकाणी ह्या वस्तू असतील त्या ठिकाणी वैभव, पैसे आपोआप खेचले जाईल नक्की करून पहा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




