धार्मिक

३० एप्रिल संकष्टी चतुर्थी इथे काढा एक स्वस्तिक, घर सुख समृद्धीने भरेल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो चैत्र महिन्यात येणारी चतुर्थी म्हणजे संकष्टी चतुर्थी हि उद्या ३० एप्रिल शुक्रवारी येत आहे. श्री गणेश हे प्रथम पूजनीय आहेत आणि कुठलेही शुभ काम करताना आपण श्री गणेशांची पूजा करतो. जेणेकरून आपले कार्य सफल होईल. श्री गणेशाच्या नावाने फक्त आपल्या शरीरात, आपल्या घरात आपल्या परिसरात चैतन्य व आनंदमय वातावरण निर्माण होते. श्री गणेश विघ्णहर्ता आहेत आणि ३० एप्रिल ला येणारी संकष्टी हि विकट संकष्टी म्हणून ओळखली जाते ह्या संकष्टीला गणेशांच्या विकट रूपाचे पूजन केले जाते. श्री गणेशांच्या ह्या नावाचा संकटनाशन स्रोतांमध्ये उल्लेख केला आहे.

मित्रांनो तुम्हाला जीवनामध्ये खूप धन मिळवायचे असेल आणि सफलता प्रप्त करायची असेल तर आपण संकष्टीचे व्रत हे अवश्य केले पाहिजे, ह्यादिवशी सकाळी उठून लवकर स्नान करावे. नंतर श्री गणेशांची पूजा अर्चना करावी त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण कराव्यात त्यांना धूपदीप दाखवून आणि एक गोष्ट मात्र नक्की करा कि त्यांना प्रिय असणारे जास्वंदीचे फुल हे नक्की अर्पण करावे. आणि ते शक्यतो लाल रंगाचे असावे. त्यानंतर तुम्ही श्री गणेशांच्या चरणी ११ किंवा २१ मोदकांचा नैवद्य दाखवा.

त्यानंतर मित्रांनो ह्या दिवशी आपण करावयाचा उपाय आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो ह्या दिवशी श्री गणेशांचा कृपाआशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक छोटा उपाय आपण करायचा आहे ज्यामुळे आपल्या सर्व धानसमस्या अडचणी राहणार नाहीत. घरामध्ये पैसा टिकून राहील. घरामध्ये आणखी काही अडचणी असतील तर त्यादेखी दूर होतील. मित्रांनो ह्या उपायासाठी एक विड्याचे पान घ्याचे आहे आणि त्याच्यावर कुंकवाच्या साह्याने त्यावर स्वस्तिक काढायचे आहे.

हे पान आपल्याला श्री गणेशांची पूजा नैवद्य दाखवून झाल्यानंतर आपण हे पान तिथे गणेशांना अर्पण करायचे आहे. आणि गणेशांना आपण हाथ जोडून आपण प्रार्थना करायची आहे आपण त्यांना सांगायचे आहे कि हे श्री गणेशा मला माझ्या सर्व आर्थिक अडचणीतून मुक्त कर. हा उपाय करताना आपण मनामध्ये श्रद्धा व भक्ती भावनेने करायचा आहे, ज्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होतील.

आणि पूजा झाल्यानंतर आपण ते पान आहे ते दुसऱ्या दिवशी आपण वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्याचे आहे. ह्यामुळे आपल्या सर्व आर्थिक समस्या नक्की दूर होतील. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट