धार्मिक

30 ऑगस्ट श्रावणी सोमवार कृष्ण जन्माष्टमी घरात घेऊन या हि एक वस्तू.

नमस्कार मित्रांनो सर्वजण कसे आहेत मजेत ना, मित्रांनो दरवर्षीप्रमाणे श्रावणातील कृष्णपक्षातील अष्टमी तिथीस आपण जन्माष्टीमीचा उत्सव साजरा करणार आहोत. जन्माष्टमी म्हणजे श्री कृष्णनांचा जन्मदिवस अशी मान्यता आहे कि जी व्यक्ती ह्या दिवशी भगवान श्री कृष्णांचे पूजन करते तिच्या जीवनातील कष्ट संकटे भगवान श्री कृष्ण नक्की दूर करतात. मित्रांनो ह्या वर्षी आलेली जन्माष्टमी अतिशय दुर्लभ सयोंगत जुळून आलेला दिवस आहे ह्या वर्षीच्या जन्माष्टमीस रोहिणी नक्षत्र, अर्धरात्रकालीन आष्टमी तिथी व सोमवारचा संयोग आहे. मित्रांनो अश्या प्रकारचा संयोग १०१ वर्षांतून जुळून आला आहे.

मित्रांनो ह्या दिवशी आपण ह्यापैकी कोणतेही एक वस्तू किंवा सर्व वस्तू आपल्या घरी घेऊन या ह्या वस्तूंचा व भगवान श्री कृष्णनांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. ह्या वस्तू ज्यांच्या घरात असतात त्यांच्या घरावर भवगवान श्री कृष्णांचा आशीर्वाद कायम राहतो. मित्रांनो ह्या वर्षीचा भवगवान श्री कृष्णांचा पूजेचा जो मुहूर्त आहे तो ३० ऑगस्ट रात्री ११:५९ मीनातानी सुरु होत आहे व १२:४४ मिंटणार्यांत आहे. या कालावधीत आपण भवगवान श्री कृष्णांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद नक्की मिळवा.

मित्रांनो पहिली वस्तू आहे ती म्हणजे गाई व तिचे बछडा असलेली मूर्ती किंवा त्यांचा फोटो. मित्रांनो गौलोकांमध्येच श्री कृष्णांचा वास असतो. शिवाय गौमातेत ३३ कोटी देवीदेवतांचा वास आहे असे हिंदू शास्त्र मानते. ह्या दिवशी ह्या गाई बछड्याची केलीली पूजा हि आपल्या घरात सुख समृद्धी निर्माण करते.

गाईमध्ये गुरु ग्रहाचा वास असतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह जर पापी ग्रहांसोबत जर युती करत असेल तर आपल्या घरात गरिबी येते. म्हणून गुरु ग्रहाला प्रबळ बनवण्यासाठी आपण ह्या गाई व बछड्याची एकत्रित असेलेला फोटो किंवा मूर्तीची पूजा करावी. आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात हि मूर्ती किंवा फोटो स्थापन करून आपण त्याची पूजा करायची आहे.

दुसरी वस्तू आहे ती म्हणजे मोरपंख, भवगवान श्री कृष्ण आपल्या मस्तकी धारण करणारे हे मोरपंख आहेत अश्या ह्या मोरपंखांचा वापर आपण श्री कृष्णांच्या पूजेत आपण नक्की करा. भगवान श्री कृष्णांच्या शृंगारातील एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मोरपंख. काही मोरपंख आपण घरात आणून ते आपण आपल्या घरात लावू शकता. मित्रानो मोरपंख ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी अमंगल गोष्टी आपोआप टळतात.

तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे बासरी किंवा पावा, हि बासरी घरातील सर्व नकारात्मकता तसेच वाईट शक्तींपासून आपले संरक्षण करते. बऱ्याच लोकांना हि घरात कशी लावावी कळत नाही तर मित्रांनो आपल्या घरातील हॉल मध्ये आपण हि बासरी लावावी आणि ती नेहमी तिरपी लावावी ती कधीसुद्धा उभी लावू नये. तीचे जे तोंड आहे ते खालच्या बाजूने असेल ह्याची काळजी घ्यावी.

आपण भवगवान श्री कृष्णांचा पूजेत लोणी खडीसाखर ह्याचा वापर अवश्य करा त्यांना भोग म्हणून नैवैद्य म्हणून तो आपण नक्की दाखवा. आपल्या घरातील कुटुंबियांना आरोग्य प्राप्ती नक्की होईल. मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट