धार्मिक

३ सप्टेंबर शुक्रवारी अजा एकादशी, हि कामे टाळा नाहीतर होईल नुकसान.

नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं आमच्या वेबसाइट वरती मनापासून स्वागत. मित्रांनो उद्या ३ सप्टेंबर शुक्रवारी अजा एकादशी आली आहे. तसेच तिथी नुसार जर पहिले तर भाद्रपत महिन्यात कृष्ण पक्षातील एकादशीला अजा एकादशी साजरी होते. आज आपण ह्या अजा एकादशी बद्दल आपण आज माहिती जाणून घेउयात.

मित्रांनो ह्या अजा एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची आराधना केल्याने आपल्या जीवनातील सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते. त्या पापांतून मुक्ती तर होतेच शिवाय आपल्याला पुण्य प्राप्ती होते. मित्रांनो ह्या एकादशी दिवशी जर आपण व्रत करणार असाल तर चुकूनही ह्या दिवशी आपण तांदळाचे सेवन टाळावे. ह्या व्रतात आपण एकवेळ जेवण करू शकता परंतु त्या वेळेत आपण फलाहार करावा ह्या दिवशी तांदूळ खाणे वर्जित आहे. कारण शास्त्राच्या मान्यतेनुसार जर ह्या दिवशी आपण तांदळाचे सेवन केले तर आपल्याला पुढील जन्मात रंगणाऱ्या किड्यांचे जन्म येतो म्हणून ह्या दिवशी तांदळाचे सेवन करू नयेत.

मित्रांनो ह्या दिवशी विष्णूंची आराधना केल्याने आपल्याला जीवनामध्ये शुभ फळांची प्राप्ती होते खासकरून तुम्ही जर आर्थिक समस्यांमध्ये असाल किंवा सतत च्या अजरपणाची समस्या असेल तर हे आजारपनातून सुटका होते. ह्या दिवसाला फार मोठे महत्व आहे, ह्या दिवशी केल्या जाणाऱ्या दान व ध्यान ह्या दोन्हीला खूप महत्व दिले जाते. ह्या दिवशी आपण खासकरून पिवळ्या रंगाची कपडे परिधान करावीत. तसेच पिवळी फळे असतील किंवा त्या रंगाची डाळ किंवा इतर काही खाद्यपदार्थ असतील त्यांचे दान आपण ह्या दिवशी करावे.

मित्रांनो अशी मान्यता आहे की ह्या दिवशी रात्री झोपू नये ह्या रात्री जाग्रण करून श्री हरी विष्णूंचे ध्यान केले पाहिजे श्री हरी विष्णूंची उपासना, भजन, जप करावा. मित्रांनो ह्या दिवशी चुकूनही भांडण तंटे, वादविवाद करू नयेत. ह्या दिवशी तुळशीचे दान केल्याने आपल्या सौभाग्य वृद्धी साठी फारच शुभ मानले जाते. ह्या दिवशी दान केल्याने भगवान श्री हरी विष्णूंची कृपा आपल्याला सैदव मिळत राहते. ह्या दिवशी आपण पिवळ्या रंगाची फळे फुले अर्पण करावीत.

ह्या दिवशी आपण घरात शंख नक्की वाजवावा. कारण शंख वाजवल्याने घरातील सर्व नाकारात्मक शक्ती निघून जाते. मित्रांनो ह्या दिवशी केल्या जाणाऱ्या वरील उपायांमुळे आपल्या घरातील सर्व आजारपण निघून जाते, तुमच्या मार्गातील आलेल्या सर्व समस्या दूर होतात. मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट