धार्मिक

७ फेब्रुवारी सोमवार रथसप्तमी पैसा, प्रतिष्ठा यश मिळवण्यासाठी करा हा एक उपाय.

सूर्यदेवांचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस म्हणजे रथसप्तमी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीस रथसप्तमी साजरी केली जाते. महर्षी कश्यप व देवमाता अदिती ह्यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला. सूर्यदेव म्हणजे साक्षात विष्णूंचे एक रूपच आहे त्यांना सूर्यनारायण असे देखील संबोधले जाते.

संपूर्ण विश्वाला आपल्या प्रकाशाने प्रकाशमय करणाऱ्या सूर्यदेवांमुळे आपल्या पृथ्वीतलावर जीवसृष्टी अस्तित्वात आहे. रथसप्तमीला आपण नेमके काय करावे सूर्यदेवांची पूजा कशी करावी. रथसप्तमीला आपण सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि सूर्यदेवांची १२ नावे घेऊन कमीत कमी १२ सूर्यनमस्कार घालावेत.

हिंदुधर्मशास्त्रात असे मानले जाते कि जी व्यक्ती सलग २० वर्ष दररोज नित्यनियमाने सूर्यनमस्कार घालते त्या व्यक्तींवर सूर्यदेव नक्की प्रसन्न होतात. मित्रांनो ह्या दिवशी रथात बसलेल्या सूर्यदेवांची आकृती काढावी व त्याची पूजा कारवी बाजारात अश्या प्रकारचे चित्र देखील उपलब्ध आहे तर अश्या प्रकारे आपण चित्र घेऊन आपण त्याची पूजा करू शकता. सूर्यदेवाला आपण लाल रंगाची फुले वाहावीत प्रार्थना करावी एखादे सूर्यदेवतेचे स्तोत्र भक्तिभावाने ऐकावे किंवा पठण करावे.

ह्या दिवशी आपण मद्यपान तसेच मांसाहार चुकूनही करू नये. रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवसापासून दररोज सूर्याला प्रार्थना करून सूर्यनमस्कार घालावेत. अनेकजण रांगोळीने किंवा चंदनाने सात घोड्यांचा सूर्यनारायणांचा रथ देखील काढतात ज्यामध्ये अरूंसारथी व सूर्यनारायण काढले जातात. अंगणात गौऱ्या पेटवल्या जातात व त्यात बोलके ठेवून त्यावर दूध वतु घालवतात आणि जे राहिलेलं दूध आहे ते प्रसाद म्हणून देतात. हे सर्व आपण अंगणात सूर्यप्रकाशात करायचे असते.

रथसपत्मी पासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो ज्याला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द प्रचलित झाला आहे. ह्या सूर्यामुळे अंधःकार नाहीसा होतो. हळदी कुंकवाचा हा शेवटचा दिवस जे संक्रांतीपासून सुरु झाले होते त्याचा हा शेवटचा दिवस.

मित्रांनो तुम्हाला ह्या वरीलपैकी काहीही करणे जमले नाही तरी मात्र आपण सूर्याला अर्घ्य नक्की अर्पण करा. सूर्याचे केवळ दर्शन जरी घेतले तरी ते प्रसन्न होतात. ज्यांना आपली डोळ्यांची दृष्टी चांगली राहावी असे वाटते त्यांनी उगवत्या सूर्यास एकसलग पाहून त्राटक करावे काही मिनटे आपण हे केल्याने आपली डोळ्यांची शक्ती चांगली बनवते.

रथसप्तमीच्या दिवशी अंगणातील तुळशीकडे एका मातीच्या चुलीवर मातीच्या भांड्यात खीर शिजवली जाते आणि ती वतु जाऊपर्यंत शिजवतात कधी कधी हि जळते सुद्धा आणि अशी खीर आपण प्रसाद म्हणून खातात उद्देश असा कि जीवनात सर्व काही दिवस सारखे नसतात काही वाईट तर काही चांगले हे जळके अन्न खाऊन सुद्धा आपल्याला काही दिवस आपल्याला काढावे लागतील तर त्यासाठी आपण तयार असावे ह्याची आठवण करून देणारा हा सण मानण्यात येतो.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट