धार्मिक

९ जुलै शुक्रवार दर्श अमावस्या घरात इथे लावा फक्त ५ दिवे, आयुष्यात पैसा कमी पडणार नाही.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो ९जुलै शुक्रवार आणि ह्या दिवशी आली आहे दर्श अमावस्या. शुक्रवारी पहाटे ५.१६ मिनिटांनी सुरु होत आहे आणि १० जुलै सकाळी ६.४६ मिनीटांनी समाप्त होत आहे. ह्या दिवशी केलेले उपाय अत्यंत जलद फलप्राप्त करून देणारे असतात म्हणूनच आपण ह्या दिवशी एक उपाय करणार आहोत ज्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबात पैसा कधीच कमी पडणार नाही. मित्रांनो तुम्ही फक्त आपल्या घरामध्ये ५ दिवे आपण ५ ठिकाणी प्रज्वलित करणार आहोत.

ह्या उपायाने माता लक्ष्मी तुमच्या घरात कायम स्वरूपी वास करतील. आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात कि ह्या अमावस्याच्या रात्री आपण कोणत्या ठिकाणी हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. मित्रांनो हिंदू धर्म शास्त्रात दिव्यांचे फार महत्व आहे देवपूजा असुद्या नाहीतर दिवाळी सारखा सण असुद्या दिवा हा लागतोच, कारण ह्या दिव्याचे महत्वव अनन्यसाधारण आहे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा असा हा दिवा आहे म्हणून हे ५ दिवे आपण नक्की लावा.

पहिले ठिकाण आहे ते म्हणजे आपल्या घरातील देवघर, हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण आपल्या घरातील सर्व सकरात्मक ऊर्जेचे केंद्र आहे हे म्हणून सूर्यास्ताच्या वेळी आपण ह्या ठिकाणी एक दिवा नक्की लावावा, हा दिवा आपण देशी गाईच्या तुपाचा वापर करावा. मित्रांनो ह्या दिवशी आपण लावलेल्या तुपाच्या दिव्यामुळे घरात धनाची आवक वाढू लागते, आपल्या घरात पैसा येऊ लागतो.

दुसरे जे ठिकाण आहे ते म्हणजे तुळशी समोर, प्रेत्येक हिंदू धर्मीय लोकांकडे हि तुळस असायलाच हवी आणि ह्या तुळशीसमोर आपण दिवा लावायचा आहे. आणि ह्या दिवशी आपण तुळशी मातेसमोर दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी आल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो आपण ह्या दिवशी तुपाचाच दिवा देशी गाईचे तूप असावे नाहीतर आपण तेलाचा दिवा लावला तरी चालेल. सायंकाळी हा दिवा आपण लावायचा आहे.

तिसरे जे ठिकाण आहे ते म्हणजे पिंपळ होय आपण सायंकाळी ह्या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा ह्या झाडाखाली लावायचा आहे. पिंपळाच्या झाडात अनेक देवीदेवांचा वास असतो आणि विशेष करून अमावास्या च्या रात्री आपण जर मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तर आपल्याला अचानक धनप्राप्तीचे योग निर्माण होतात. आपण विचार हि करणार नाही अश्या प्रकारे पैसा येऊ लागतो. ज्यांना विवाह संबंधी काही समस्या असतील तर त्यांनी देखील असा एक दिवा प्रज्वलित करा सर्व बाधा दूर होतील.

चौथे ठिकाण आहे म्हणजे आपले घराचे मुख्य दार ह्या दाराच्या दोन्ही बाजूला आपण एक एक तुपाचा दिवा लावायचा आहे. मित्रांनो ह्या मुख्य दरवाजातूनच लक्ष्मी देवीला आमंत्रित करण्यासाठी असे दोन दिवे आपण मुख्य दारावर लावायचे आहेत. जेणेकरून घरात माता लक्ष्मीचे आगमन होईल.

पाचवा आणि महत्वाचा दिवा जो कि आपण आपल्या छतावरती लावायचा आहे. मित्रांनो असे केल्याने माता लक्ष्मीची अस्सीम कृपा बरसते असे हिंदू धर्मशास्त्र मानते आणि आयुष्यभर तुम्ही जे काही काम कराल त्यातून भरपूर पैसा येतो आणि तो कमी पडत नाही. घरातून व्यर्थ कामासाठी पैसा बाहेर जात नाही. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट