नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो ९ जुलै शुक्रवारचा दिवस आणि ह्या दिवशी अली आहे दर्श अमावस्या मित्रांनो आणि अमावस्या तिथी म्हणले कि अशी तिथी जी सर्व मनोकामना पूर्ण करते. अमावस्याच्या दिवशी केलेलं तोटके किंवा उपाय हे कधीच निशफल ठरत नाही आणि लवकर फळ प्रदान करतात.
मित्रांनो १८ विश्व दारिद्र्य असेल किंवा आपल्या घरात देखील गरिबी असेल, तुम्ही कितीही कष्ट करूनदेखील कितीही परिश्रम केल्या आपल्या घरी जर पैसा धन येत नसेल तर मित्रांनो हा एक उपाय करा. होय अत्यंत छोटा उपाय पण तितकाच प्रभावी आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय जास्त महत्वव सांगितले आहे. जो कोणी हा उपाय करतो त्याला धनलाभ अवश्य होतो. मात्र एकच अट आहे ती म्हणजे हा उपाय करताना पूर्ण श्रद्धने, निष्ठेने करा मनात कोणत्याही प्रकारची शंका असेल तर हा उपाय आपल्याला फलदायी ठरणार नाही.
हा उपाय आपल्याला शुक्रवारी उद्या करायचा आहे आणि त्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे ती म्हणजे सकाळची. मित्रांनो शक्यतो तुम्ही ब्राह्ममुहूर्तावर उठावे ज्यांना शकय नसेल त्यांनी कमीत कमी सूर्योदय होण्यापूर्वी तरी उठावे. कारण ह्या उपायासाठी वेळ हि सकाळच्या १० वाजेपरेंत आहे. सकाळी १० च्या आधी उपाय केल्याने त्याची अत्यंत लवकर फळ प्राप्ती होते. घरामध्ये पैस्यांचा ओघ निर्माण होतो.
मित्रांनो हा उपाय त्यांनी करावा ज्यांच्या कडे बुद्धीमत्ता आहे कष्ट करतायत परंतु माता लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर होत नाहीए, ज्यांना नशीब साथ देत नाहीए अश्या लोकांनी दुर्भाग्याचे रूपांतर सौभाग्यात करण्यासाठी हा उपाय करावा.
जे लोक राजकारणात आहे त्यांनी आपल्या उज्जवल भवितव्यसाठी हा उपाय अवश्य करावा, जे विद्यार्थी दशेत आहेत त्यांनी देखील हा उपाय करावा तसेच ज्यांना पितृदोष आहे अश्या व्यक्तींनी देखील ह्या अमवस्याच्या तिथीवर हा उपाय नक्की करावा. तर मित्रांनो आपण सकाळी उठल्याबरोबर स्नान नक्की करावे.
स्नान करताना आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यात गंगाजल थोडे टाका व त्याने आपण स्नान करावे, हे करताना आपण आपल्या तीर्थांचे तसेच पूर्वजांचे आवाहन करावे. त्यानंतर आपण स्वच्छ वस्त्रे परिधान करावी त्यानंतर आपण एक तांब्या जल पाणी घ्यावे. व त्यात आपण थोडे लाल चंदन टाका. ज्योतिष उपायांमध्ये ह्या लाल चंदनाचे फार महत्वव आहे. असे थोडेसे लाल चंदन आपण त्यात टाकायचे आहे.
थोडेसे गंगाजल देखील टाकायचे आहे नसेल तरी चालेल. अश्या तांब्यातील पाण्याने आपण भगवान सूर्यनारायणांना हे जल अर्पण करायचे आहे. मित्रांनो सूर्यदेव हे संपूर्ण हे संपूर्ण सृष्टीवरती प्राण फुंकणारे आहेत अश्या सूर्यनारायणांना आपण अर्घ्य अर्पण करताना आपण ओम पितृभ्यो नमः ! ह्या मंत्राचा जप करायचा आहे कमीत कमी हे ३ वेळा अर्घ्य अर्पण करायचे आहे. अर्घ्य आपण देताना आपल्या दोन्ही हातात तो तांब्या घेऊन आपल्या डोक्याच्या वरती धरायचा आहे. आणि त्यानंतर आपण हे पाणी सूर्याकडे पाहत टाकायचे आहे.
लक्षात घ्या कि हे पाणी आपल्या पायावर पडू नये आणि त्या पाण्यातून आपण सूर्य नरायणांचे दर्शन करायचे आहे. अश्या प्रकारे आपण हा साधा उपाय करायचा आहे. जेणेकरून आपल्याला सूर्य देवतेची कृपा प्राप्त होते तसेच आपले पितृदोष देखील नाहीसे होतात.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद




