History of Garuda Pillar in Vitthal Temple
धार्मिक

पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरातील गरुड खांबाचा एक जुना इतिहास.

पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरा म्हणजे वारकरी संप्रदायचे आराध्य देवस्थन. दरवर्षी या ठिकाणी संख्य भाविक दर्शना साठी येत असतात. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून संख्य पालख्या एकादशी दिशी पंढरपूरला येत असतात. कित्येक किलोमीटर चालत पंढरपूरला येतात. तरी सुद्धा भक्तांच्या शरीराची ऊर्जा थोडी सुद्धा कमी होत नाही. कारण मनात फक्त पांडुरंगाच्या दर्शनाची इच्छा मनात असते.

पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरात एक दगडी खाब आहे. त्याचे नाव आहे गरुड खांब. भक्त ज्या वेळेस विठ्ठल मंदिरा दर्शना साठी जातात. त्याच वेळेस एका दगडी म्हणजेच गरुड खंबाला नमस्कार करतात. त्याचे दर्शन घेतात. पण बऱ्याच भक्तांना गरुड खाबाचा इतिहास माहीत नसेल. विठ्ठलाच्या दर्शन आधी किंवा नंतर का या खाबाचे दर्शन घ्यावे याबद्दल थोडक्यात माहिती जाऊन घेऊ.

शिवाप्पा हे कर्नाटकातील एक विठ्ठल भक्त होते. त्यानं लहान पणी तिनप्पा या नावाने सुद्धा त्यांना ओळखले जात असे. १४८१ ते १५६४ यांचा काळ होता. घरात पहिल्यापासून भक्ती भावनेचा भाव होतात. आणि तीच परंपरा त्यांनी सुद्धा तशीच पुढे नेली. शिवाप्पा यांचे काही वर्षा नंतर लग्न झाले. तरी सुद्धा ते विठ्ठलाची भक्ती करत असत.

तसे तर शिवाप्पा याना संस्कृत भाषेत रस होतात. ते संस्कृत भाषेतून संपूर्ण शस्त्राचा अध्ययन करत होते. तसेच त्यांना भजनाची खुप आवड होती. ते नेहमी भजनातून देवाचे नामस्मरण करत असत. प्रत्येक क्षणात फक्त देवाचे नामस्मरण करणे आणि इतरांना या मध्यमातून भक्ती मय करत असत. इतके तल्लीन झाले होते की भगवंतांच्या व्यतिरिक्त त्यांना इतर काही दिसत नव्हते.

भगवान पाडुरंग हे यांच्या भक्ती वरती प्रसन्न होऊन त्यांच्या स्वप्नांत जातात आणि सागतात. तीर्थ यात्रा करून पंढरपूरला ये. यात्रेला निघाले असतात विजयनगरला आल्यावर त्या ठिकाणचे राजे कृष्ण देव राय हे शिवाप्पा यांच्या भक्तीला प्रभावित झाले होते. आणि ते सुद्धा भक्त झाले. राजे कृष्ण देव राय यांनी तिरुपती बालाजी या ठिकाणी भजन मंडपाची निर्मिती केली. त्याचे नाव ठेवले दास मंडप.

हे पण वाचा :-  ३० सप्टेंबर मोठा गुरुवार गुपचूप ठेवा इथे एक हळकुंडाचा तुकडा, पैसे इतका येईल कि

शिवाप्पा हे विठ्ठलाची इतकी भक्ती करायचे कि त्यांचे नाव सुद्धा पुंरदर विठ्ठला असे झाले होते. कालातंराने त्यांची दिशा झाली होती ती म्हणजे वैष्णव संप्रदाय मध्ये. ब्रम्ह महत्व भगवत संप्रदाय (वैष्णव संप्रदाय) मधील एका संतांनी त्यांना नवीन नाव दिले पुरंदर दास. पुढे चालून ते याच नावावे प्रसिद्ध झाले. पुरंदर दास हे विविध ठिकाणी जाऊन देवाचे नामस्मरण करायचे. त्या ठकाणचे वातावरण भक्ती मय करायचे.

पुरंदर दास हे पंढपूरला आले असतात त्या ठिकाणी सुद्धा त्यानी असंख्य भक्त तयार केले होते. रोज भजन कीर्तन होत असे. अशा वेळी एक वाईट प्रसंग त्यांच्यावर आला. पंढरपुरात नर्तकी राहत होती ती विठ्ठलाची खुप मोठी भक्त होती. भगवान दिला दर्शन देण्यासाठी पुरंदर दास यांचे रूप धरण करून तिला दर्शन देतात. आणि तिला प्रसन्न होऊन आपल्या जवळील सोन्याची एक भेट वस्तू देतात.

काही दिवसात असे समजते मंदिरातील सोन्याची वस्तू गायब झली आहे. या वस्तूची शोधाशोघ सुरु होते. आणि काही दिवसात असे समजते कि हि सोन्याची वस्तू नर्तकीच्या घरी आहे. तिला याबद्दल विचारले असतात असे समजते कि हि वस्तू पुरंदर दास यांनी दिली आहे. पुरंदर दास याना पडकून मंदिरातील खांबाला बांधले जाते. आणि वेदना दिल्या जातात.

या सर्व गोष्टी पाहून भगवान विठठल याना राहवत नाही. आपल्या भक्ताला होणार त्रास त्यांना बघितला जात नव्हता. स्वतः भगवान सर्व खरी गोष्ट सागतात. आणि हे सागतात ज्या खांबाला बांधले आहे त्याची पूजा करा. अशा पद्धतीने हा खांब पुरंदर दास या नावाने ओळखला जाऊ लागला. काही वेळेस त्याला गरुड खांब असे सुद्धा म्हणतात.

ज्या वेळेस आपण पंढरपूरला विठ्ठल मंदिरात दर्शना साठी जाऊ त्या ठिकाणी कान्होपात्रा वृक्षाचा जवळच हा खाब आहे याचे दर्शन अवश्य घ्यावे.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

हे पण वाचा :-  २७ एप्रिल चैत्री पौर्णिमा, मंगळवार, हनुमान जयंती, देवघरात ठेवा हा नैवद्य.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.