वास्तू शास्त्र नुसार कपाट आणि तिजोरी या दिशेला ठेवा, According to Vastu Shastra, place the cupboard
वास्तू शास्त्र

वास्तू शास्त्रा नुसार कपाट आणि तिजोरी या दिशेला ठेवा.

आपल्या घरात पैसा, धन संपत्ती घरात टिकणु रहण्यासाठी तसेच घरात पैसा हा विविध मार्गाने आपल्या घरात यावा या साठी सुद्धा तुम्ही काही नियम पाळणे गरजेचे आहे. कोणते नियम आहेत. त्याच बरोबर घरातील तिजोरी आणि कपाट कोणत्या दिशेला ठेवले पाहिजे. त्याचे दार कोणत्या दिशेला उघडले पाहिजे या बद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ.

कपाट कोणत्या दिशेला ठेवावे

वास्तू शास्त्रा मध्ये प्रत्येक वस्तूला एक विशिष्ट जागा दिलेली आहे. त्याच ठिकाणी ती वस्तू ठेवली तर त्याचे लाभ खुप चागले मिळतात. त्याच प्रमाणे आपल्या घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा किंवा कपाट हे कोणत्या दिशेला असायला हवे आणि त्याचे तोंड कोणत्या दिशेला असले पाहिजे दरवाजा उघडण्याची दिशा कोणती असली पाहिजे याचे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे.

जर का या वस्तू योग्य दिशेला नसतील तर आपल्या घरात आलेला पैसा सुद्धा निघून जाईल. ज्या मार्गे आपल्या घरात पैसा येत असतो ते सुद्धा काही दिवसात कमी होण्याची शक्यता असते. आणि हळू हळू आपल्याला आर्थिक चणचण जनवण्यास सुरवात होते. काही वेळेस आपल्या घरात वास्तू दोष सुद्धा निर्माण होऊ शकतात. एकदा का वस्तू दोष घरात निर्माण झाला तर आपल्या यापेक्षा सुद्धा मोठ्या समस्या येऊ शकतात.

घरातील कपाट किंवा तिजोरी या दिशेला ठेवा.

घरातील कपाट किंवा तिजोरी हि दक्षिण दिशेला असली पाहिजे आणि त्याचे दरवाजे हे उत्तर दिशेला उघडणारे असले पाहिजे. जर का आपण कपाट किंवा तिजोरी चुकीच्या दिशेला असेल तर त्याचा त्रास आपल्या काही दिवसात दिसण्यास सुरवात होईल. जर का आपल्या घरातील तिजोरीचा दरवाजा हा उत्तर दिसेल उघडणारा असेल तर खुप चागले असते.. वास्तू शास्त्रा नुसार उत्तर दिशा हि कुबेर देवाची दिशा आहे.

काही जणांना दक्षिण दिशेला तिजोरी किंवा कपाट ठेवता येत नसेल अशा वेळेस तुम्ही पश्चिम दिशेचा उपयोग करू शकतात. पश्चिम भिंतीला कपाट किंवा तिजोरी ठेऊ शकतात आणि त्याचे दरवाजे हे पूर्व दिशेला उघडतील याची काळजी घ्या. पूर्व दिशा हि इंद्र देवा सोबत सूर्याची दिशा आहे. सूर्य देवता हि ऊर्जा देणारी देवता आहे. जर का पण आपल्या कपाटात जे काही अलंकार, दागिने ठेवले आहे. त्यात नक्की वृद्धी होण्यास मदत होईल.

हे पण वाचा :-  घरात बऱ्याच प्रमाणात अडचणी येत असतील तर टॉयलेट मध्ये हे जाळा अडचणी कमी होतील.

कपाट ठेवायला या दोन दिशा आहेत योग्य.

या दोन दिशा आहेत त्या ठिकाणी तुम्ही तिजोरी किंवा आपले कपाट ठेवावे जेणेकरून खूप प्रकारे लाभ मिळतात. मग अशा कोणत्या दिशा आहेत ज्या ठिकाणी आपण तिजोरी किंवा कपाट बिलकुल ठेवले नाही पाहिजे. या दिशां बद्दल माहिती जाणून घेऊ. उत्तर भिंतीला लावून कपाट किंवा तिजोरी बिलकुल ठेऊ नका कारण याचे दरवाजे जे दक्षणी दिशेला उघडतील आणि दक्षिण दिशा हि यमाची दिशा आहे. आणि ज्या काही नाकारात्मक ऊर्जा आहेत त्या सर्व दक्षिण दिशा मध्ये असतात.

दुसरी दिशा म्हणजे पूर्व. जर का पण पूर्व दिशेला तिजोरी किंवा कपाट ठेवले असेल आणि त्याचे दरवाजे हे पश्चिम दिशेला उघडणारे असतील तर हे पण चुकीचे आहे. कारण पश्चिम दिशा हि वरून देवाची दिशा आहे. वरून देवाची नजर आपल्या पैसा आणि संपत्तीवर पडत असेल तर तो पैसा वाऱ्यासोबत वाहून जातो म्हणजेच का तर विनाकारण पैसा खर्च होत जातो. त्यामुळे शक्यतो या दोन दिशेला आपली तिजोरी आणि कपाट ठेऊ नका.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.