घरगुती उपाय

वजन, पित्त, ऍसिडिटी, गॅसेस, पोट साफ करण्यासाठी फक्त दिवसातून एकदा.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, मित्रांनो दिवसभरात प्या फक्त हे पाणी जीवनभरात आपल्याला पित्ताचा त्रास होणार नाही. गॅस, अपचन, करपट ढेकर, वाढलेले वजन हे सर्व देखील बंद होईल सध्या आपण घेत असलेल्या आहारामुळे गॅसेस किंवा पित्त अपचन हि समस्या आजकाल जास्त पाहायला मिळते. आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींचा आहार कमी असून देखील वजन वाढत आहे, त्याचप्रमाणे पित्तासाठी दररोज गोळी घ्यावी लागत असेल, कफ वाढत असेल तर आजचा आपला उपाय तुम्ही नक्की करून पहा.

ह्या उपायाने पोटावरील चरबी कमी होते, पोट झटपट साफ होते, खाल्लेले लगेच पचते, त्याचप्रमाणे गुडघेदुखी देखील कमी होते. अश्या सर्व बाबींवर आजचा उपाय महत्वाचा आहे तर कोणता पदार्थ आपण वापरणार आहोत त्याचे प्रमाण काय हे सर्व आपण आजच्या लेखात जाणून घेउयात. उपाय अगदी सोपा आहे तितकाच प्रभावी देखील आहे. हा उपाय महान ग्रंथ सार्थशारंगधर संहिता ह्या ग्रंथात सांगितला असून ह्याच वापर फार पूर्वीपासून पित्त आणि कफ साठी केला जातो.

उपायासाठी आपल्याला पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे जव, आपल्यापैकी कोणी गव्हाची शेती करत असतील तर त्यांना ह्याबद्दल नक्की माहिती असेल. अश्या ह्या जवा एक प्रकारच्या तनांमध्ये उगवतात ह्याला इंग्रजी मध्ये मार्टिन बार्ली किंवा फक्त बार्ली असे देखील म्हणतात. असे हे जव तुम्हाला तुमच्या शेजारपास किराणा दुकानात सहज उपलब्ध होईल. अश्या ह्या जवा आपण एक वेळेच्या उपायासाठी २ चमचे घ्याच्या आहेत. ह्या जवा चांगल्या भाजून घ्याच्या आहेत.

ह्या जवांमध्ये फोस्पेरिक ऍसिड व लायसिन असते. जे कि आपले वजन वाढून देत नाही त्याचप्रमाणे आपल्या शरीरात अतिरिक्त फॅट वाढून देत नाही. ह्या जवांमध्ये सॅलिसिलिक ऍसिड, पोटॅशिअम, कॅलसियम मोठ्या प्रमाणात असते जे कि आपली हाडे मजबूत बनवतात. ह्यामुळे आपल्या गुडघेदुखीच्या समस्या बंद होतात. जश्या तुम्ही ह्या जवा भाजचाल तश्या त्या फुगतील आणि जाड बनतील, ह्यात लयसिन नावाचा जो घटक असतो तो आपले पित्त कमी करण्यास मदत करतो.

हे पण वाचा :-  अवश्य काळजी घ्या जर रात्री उठून पाणी पिताय आणि रात्री उठून लघवीला जाताय. पुन्हा त्रास करून घेण्यापेक्षा आत्ताच आवश्य काळजी घ्या.

ज्यांना वजन खरेच कमी करायचे आहे त्यांनी गव्हाच्या पोळीच्या ऐवजी जवाच्या पोळी खावी भाजलेल्या जवा आपण आता वाटून घ्याव्यात आणि पाखडून त्यावरील असलेला कोंढा आपण वेगळा करायचा आहे. त्यानंतर ते आपण ते शिजवायचे आहे, शिजवताना आपण एक काळजी घ्या कि पाणी आपण जवा जेव्हढ्या घेतल्या आहेत त्याच्या १४ पट पाणी आपण घ्याचे आहे आपण २ चमचे जवा घेतल्या होत्या तर आपण २८चमचे पाणी घ्याचे आहे.

ह्या पाण्यात आपण भाजलेल्या जवा शिजवून द्याच्या आहेत त्या शिजलेल्या जवा आपण मऊ होईपर्यंत शिजवाव्यात जेणेकरून त्याचा अर्क आहे तो पाण्यात उतरेल. त्यानंतर आपण ते पाणी गाळून आपण एका कप मध्ये काढावे व ते आपण प्या. दिवसभरात आपण हे पाणी अगदी कधीहि पिऊ शकता.

चवीसाठी तुम्ही त्यात सेंधव मीठ टाकले तर त्याची चव आणखी चांगली लागते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.