फूड

कणिक मळताना त्यात टाका हि एक वस्तू मालामाल व्हाल.

लक्ष्मीची कृपा झाल्याशिवाय गरिबी जात नाही कोणत्याही गरीब व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असेल तर लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेणे फार महत्वाचे आहे. लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचे अनेक मार्ग असतात. जसे कि देवपूजा करणे, शुक्रवार, मंगळवार तसेच एकादशी आणि पौर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

ह्या सर्व गोष्टी करण्यासोबत जर तुम्ही काही छोट्या छोट्या नियमांचे जर पालन केले तर लक्ष्मी कृपा खूप लवकर होते जसे कि आपल्या घरात साफसफाई ठेवणे, व्यवस्थित झाडलोट करणे घराला सुशोभित आणि सुंदर बनवणे, ह्या गोष्टी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणतात.

ह्यासोबत आपल्या स्वयंपाक घरातील एक सर्वात महत्वाचे काम म्हणजे कणिक मळणे, प्रेत्येक स्त्रीने, महिलांनी घरातील कणिक मळताना हे एक काम अवश्य करावे, ह्या कणिकेत आपण पीठ मळताना लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या काही वस्तू टाकल्या काही पदार्थ टाकले तर त्यामुळे आपल्या घरातील लोकांचे आरोग्य देखील चांगले राहते व लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरात पैसा देखील येतो.

आता हे पदार्थ कोणते टाकायचे ते आपण जाणून घेऊयात. त्यासाठी एका गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सकाळी संध्यकाळी अगदी जेव्हा केव्हा कणिक मळत आहेत तेव्हा तेव्हा हा उपाय आपण करू शकता. तुम्हाला मासिक धर्म असेल जे ५ दिवस असतात त्या काळात देखील आपण हा उपाय करू शकता काही अडचण नाही. आता गव्हाचे पीठ असुदे किंवा ज्वारी, बाजरी किंवा आणखी कोणते पीठ असूद्यात त्यात आपण आजचा जे पण काही पदार्थ आहेत ते आपण टाकू शकता.

ह्या पदार्थांपैकी पहिली वस्तू आहे हळद, हळद हि भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे तशीच ती माता लक्ष्मीला देखील खूप प्रिय आहे, त्यामुळे घरातील लोकांचे आरोग्य सुंदर राहावे व धनवृद्धी व्हावी ह्यासाठी आपण चीमुठ्भर हळद आपण ह्या कणिकेत नक्की टाकावी अगदी दररोज नित्यनियमाने न चुकता, आता काही पीठ असतात त्यात आपण मिठाचा वापर करत नाही त्यातदेखील आपण थोडेसे मीठ नक्की टाकावे, दुसरा पदार्थ तो म्हणजे मीठ ह्यामुळे घरातील नाकारात्मक शक्ती दूर होते.

जे कोणी हे चपाती, भाकरी, रोटी खातील त्यांच्या शरीरातून नाकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे काम हे मीठ करत असते. तर हे चीमुठ्भर मीठ आपण त्याचा वापर नक्की करा. तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे कच्चे दूध गाईचे कच्चे दूध, अगदी एक चमचा दूध आपण कणिक मळताना टाका ह्या दुधात देखील लक्ष्मी प्राप्त करण्याचा गुण आहे. धनधान्याने आपले घर जर परिपूर्ण बनवायचे असेल तर आपण कच्चे दूध सुद्धा आपण नित्य नियमाने टाकत चला.

शेवटी कणिक मळून झाल्यानंतर आपण त्या कणिकेवर आपल्या बोटांची ठसे त्यावर नक्की उमटावा. अगदी एक दोन बोटे त्यावर नक्की उमटवा हा देखील एक लक्ष्मी घरात आकर्षित करण्याचा प्रभावशाली उपाय आहे. तर घरातील स्त्रियांनी आपण ह्या सर्व गोष्टींचे पालन अवश्य करा. जर लेख आवडला असेल तर आजचा लेख अवश्य लाइक व शेयर करा.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट