धार्मिक

आजच तुळशीजवळ ठेवा ह्या ३ वस्तू, पैसे सर्व बाजुंनी यायला सुरवात होईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो माता तुळशीजवळ ठेवा फक्त ह्या ३ गोष्टी सर्व मार्गांनी पैसे प्राप्ती होईल. मित्रांनो तुळस म्हणजे आपल्या अंगणाची शोभा प्रेत्येकाच्या घरात असतेच असते. तुळस हि माता लक्ष्मी चे रूप आहे. श्री हरी विष्णू ना तुळस हि सर्वात प्रिय आहे. तुळस हि शुभ समजली जाते कारण आपल्या घरात येणाऱ्या वाईट शक्तीपासून ती आपल्या घराला वाचवत असते. वातावरण पवित्र व प्रसन्न ठेवणारी हि तुळस प्रेत्येकाच्या हारासमोर असावीच. मित्रांनो ह्याचा तुळशीच्या जवळ ह्या काही वस्तू ठेवल्या तर त्याचा चांगला प्रभाव कित्येक पटीने आपल्याला मिळतो. आपण आजच्या लेखामध्ये ह्याच काही ३ गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत जे ठेवल्याने आपल्यावर लक्ष्मी माता तर प्रसन्न होतातच तसेच भगवान विष्णूंची कृपादृष्टी देखील आपल्याला प्राप्त होते. चला तर जाणून घेऊयात त्या कोणत्या तीन गोष्टी आहेत.

मित्रांनो सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्वस्तिक होय हिंदू धर्मच्यानुसार स्वस्तिक हे शुभ आणि पवित्र मानले जाते. असे मानले जाते कि जिथे स्वस्तिक असते तिथे सर्व देवदेवतांचा वास असतो. ह्या चिन्हांमध्ये सकारात्मक ऊर्जा खेचून अनन्याची शक्ती ह्या मध्ये असते. मित्रांनो खूप वेळा आपण पाहतो कि आपल्या घरामधील तुळस खूप वेळा सुकलेली दिसते ह्याचे कारण हेच आहे कि आपल्या घरामध्ये नाकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रामानात वाढली आहे. सकारात्मक शक्ती कमी होते तेव्हा आपल्या अंगणातील तुळस सूकते. आपल्या घराला नजर लागते होय माणसाप्रमाणे घराला देखील नजर लागते. अश्या वेळी तुम्ही हे स्वस्तिकच चिन्ह तुशीजवळ नक्की रेखाटा. जेणेकरून तुमच्या घरात नाकारात्मक ऊर्जा कधीच राहणार नाही. हे स्वस्तिक काढताना कुंकू वापरावे व काढत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय असलेला मंत्र नक्की जपा. ह्यामुळे आपल्या घरावरील नजरदोष दूर होतो.

मित्रांनो आजकाल पैसे म्हणजेच सर्व काही नाही आजकाल कित्येक लोकांना मुलबाळ होत नाही संतान प्राप्ती साठी कित्येक लोक खूप प्रयत्न करत असतात तेजस्वी व गुणवान संतान प्राप्ती करण्यासाठी जी गर्भवती स्त्री आहे त्यांनी तुळशीजवळ बसून भगवत गीतेचा पाठ अवश्य करा. असे केल्याने त्या स्त्रीची इच्छा नक्की प्राप्त होते.

मित्रांनो दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे शालिग्राम. हा काळ्या रंगाचा दगड असतो हा अत्यंत पवित्र मानला जातो आणि हा शालीग्राम म्हणजे दुसरे कोणी नसून तुळशीचे पती आहेत. म्हणूनच आपण ह्या शालिग्रामची स्थापना अगदी विधिवत तुळशी वृद्वांमध्ये करावी. दिवाळीनंतर जो तुळशी विवाह येतो त्यावेळी आपण हा शालीग्राम आपण तुळशीजवळ नक्की ठेवावा. आणि तुळशी विवाह संपन्न करावा. ज्या तुळशीचा विवाह झालेला नाही अश्या तुळशीजवळ शालिग्रामची स्थापना करू नका. फक्त ज्या तुळशीचा विवाह झाला आहे त्या तुलशीजवळच ते ठेवा.

मित्रांनो तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तुपाचा दिवा होय मित्रांनो संध्यकाळी तिनसांच्या वेळी आपण तुळशीसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हो ते तूप गाईचे असावे. असे म्हणतात जिथे हा दिवा सातो तिथे सर्व देवी देवता आमंत्रित होतात. हा दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय ! ह्या मंत्राचा जाप करण्यास विसरू नका. ज्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात.

सर्व प्रकारच्या कामांमध्ये यश मिळवून येणाऱ्या ह्या तीन गोष्टी आपण आज सांगितल्या आहेत. तुम्ही कोणतेही काम करत असाल मग ते उद्योग धंदा असेल नोकरी असेल किंवा अन्य कोणतेही काम असो आपल्याला यश हे नक्की प्राप्त होणार. तुमहाला शुभ बातम्या नक्की ऐकायला मिळतील. आपल्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचे संकट कधीच येत नाही. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट