धार्मिक

३ मे २०२२ मंगळावर अक्षय तृतीया, पीतृदोष दूर करण्यासाठी करा हा एक उपाय.

नमस्कार मित्रांनो, ३ मे २०२२ मंगळवार आणि ह्या दिवशी आहे अक्षय तृतीया वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा एक आहे. जर वर्षी आपण वैशाख शुक्ल त्रितीयेस आपण अक्षय तृतीया साजरी करतो. अक्षय तृतीयाचे माहात्म्य खूप मोठे आहे. ह्या दिवशी भगवान विष्णूंच्या ३ अवतारांनी पृथ्वीवर अवतार धारण केला होता. मित्रांनो अक्षय तृतीयेला आपण जे काही कर्म करू त्याचे मिळणारे पुण्य हे अक्षय राहते, ह्या पुण्याचा ऱ्हास होत नाही म्हणूनच आपण ह्या दिवशी गोरगरिबांना दानधर्म अवश्य करा, गरिबांची सेवा करा. ह्यातून मिळणारे पुण्य हे आपल्या गाठी कायमस्वरूपी टिकते.

ह्या दिवशी आपण जे मंत्र पठण करतो, ते मंत्र सिद्ध बनतात त्या मंत्रांचा अमाप फायदा आपल्याला होतो. मित्रांनो ह्या दिवशी अनेक लोक माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जप तप अनुष्ठान करतात. आपण देखील माता लक्ष्मीस प्रसन्न करण्यासाठी अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची अगदी विधिवत पूजा करा.

सोबतच जर आपल्या घरात जर पितृदोष असेल आणि त्यामुळे जर आपल्या प्रेत्येक कामात जर आपल्याला अडचण येत असेल, घरात अजरापण असेल जर घरात सारखे कोणत्या ना कोणत्या कारणाने वादविवाद होत असतील. घरात जर प्रेम शिल्लक राहिलेलं नसेल तर हि सर्व पितृदोषाची लक्षणे आहेत.

पितृदोष दूर करण्यासाठी आपण एक अत्यंत प्रभावीशाली उपाय आपण अवश्य करा. पितृ म्हणजे नेमके कोण तर जे आपल्या घरातील असे लोक ज्यांचा मृत्यू झालेला आहे. जे आपल्यात आज नाही , आपल्याकडून आज कळत नकळत अश्या काही चुका घडतात, कि ज्यामुळे पित्र अप्रसन्न नाराज होऊ शकतात, आणि ह्यामुळे पितृदोष उद्भवतो. हा पितृदोष जर दूर झाला तर पितरांच्या कृपाशीर्वादाने घरातील लोकांची भरभराट होते, घराची चहुबाजूने प्रगती होऊ लागते. हा पितृदोष दूर कसा करावा ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

हे पण वाचा :-  होळीदहनानंतर घरात घेऊन या राख आणि ठेवा इथे, घरातील सर्व अडीअडचणी दूर होतील.

मित्रांनो अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण ब्रहमुहूर्तावर उठावे, स्वच्छ स्नान करा स्नान करताना आपण अंघोळीच्या पाण्यात थोडेसे काळे तीळ किंवा थोडे गंगाजल आपण टाकावे ह्या दोन गोष्टी आपण पाण्यात टाकून आपण अंघोळ केल्याने आपल्या हातून घडणाऱ्या पापांपासून मुक्ती होते आपल्या मनाची शुद्धी होते.

ज्यांना शक्य असेल त्यांनी तीर्थक्षेत्री जाऊन पवित्र नदीत जाऊन स्नान करावे, नंतर आपण स्वच्छ कपडे परिधान करून आपण घरातील देवपूजा करावी. हि पूजा संपन्न झाल्यानंतर आपण खीर बनवायची आहे आणि त्या खिरीसोबत आपण एखादी पोळी, भाकरी, पुरी हत्यांपैकी एक बनवून आपण ती त्या खिरीत कुसकरून घ्याचि आहे व हे मिश्रण आपण आपल्या घराच्या छतावर किंवा अंगणात कावळ्यांसाठी ठेवून द्याचे आहे.

हिंदूधर्मशास्त्रात अशी मान्यता आहे कि आपले पित्र कावळ्यांच्या रूपाने पृथ्वीवर येतात आपल्या घराकडे येतात आणि आपले कोणी आठवण काढत आहेत का ते पाहतात आणि अश्या वेळी त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना हि खीर व चपाती त्यांच्यासाठी आपण अर्पण करत आहोत. जर कावळे आले आणि त्यांनी हा नैवैद्य ग्रहण केला तर लक्षात घ्या कि आपले पित्र प्रसन्न होत आहेत.

जर शहरात आपण राहत असाल आणि जर असा नैवैद्य जर तुम्ही ठेवू शकत नसाल तर जवळपासच्या कोणत्याही गाईला तुम्ही हा नैवद्य आपण खाऊ घाला. शक्य असेल तर आपण त्या गाईच्या अंगावरून हाथ फिरवा ते करत असताना आपण ओम नमो भागवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप आपण करावा.

त्या गोमातेस प्रार्थना करा कि आपल्या पितरांना शांती लाभू दे अशी. ह्याच दिवशी आपण सायंकाळी पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन हीच खीर आहे थोडी चपाती आपण ह्या झाडाखाली नेवैद्य म्हणून अर्पण करा व त्या झाडाला आपण प्रार्थना करा कि पितरांच्या आत्मयास शांती लाभू दे अशी पप्रार्थना करा. पिंपळात भगवान श्री हरी विष्णू वास करतात. जे पितृदेवता आहे ते त्यांना मोक्ष प्राप्त करून देण्याचे काम करतात हे सुद्धा आपण करू शकता, गोरगरीब व्यक्तीस आपण बोलवून हि खीर चपाती आपण खाऊ घाला.

हे पण वाचा :-  उद्या ९ मार्च विजया एकादशी घरात इथे लावा एक दिवा.

हे सर्व आपण आपल्या पितरांच्या नावाने करायचेय आहे. हे छोटे छोटे उपाय आपल्या पितरांना प्रसन्न करतात व आपल्या घराची त्यांच्या आशीर्वादाने भरभराट घडून येते. मित्रांनो ह्या अक्षय तृतीयेला हा उपाय नक्की करून पहा. तुमची पितृदोषातून मुक्ती जरूर होईल. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.