राशी भविष्य

३ मे अक्षय तृतीया शुभ महासायोंग, ह्या ५ राशींसाठी ठरणार आहे खूप फलदायी.

अक्षय तृतीया जर वर्षी हि वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते, ह्यावर्षी अक्षय तृतीया मंगळवारी ३ मे ला येत असून. हि तिथी म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त होय. ह्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, ह्या खरेदीबरोबरच दानधर्म करणे हे देखील खूप शुभ फळे देतात, ह्या दिवशी केलेलं दान हे अक्षय पुण्य देते. कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस चांगला मानला जातो. विवाहसारखी मंगल कार्य ह्या दिवशी तुम्ही अगदी बिनमुहूर्त बगता करू शकता.

ह्या दिवशी तुम्ही आपल्या राशीच्या अनुसार दान करू शकता त्याच्याने आपल्याला खूप शुभ फळ मिळते. अक्षय तृतीया हि हिंदू धर्मात खूप शुभ मानली जाते ह्या दिवशी दोन मुख्य ग्रह आपल्या आपल्या राशींमध्ये आणि दोन ग्रह त्यांच्या उच्च राशींमध्ये उपस्थित राहतील. असा योगायोग अगदी ५० वर्षातून घडतो आहे. ह्याचा अर्थातच १२ राशींवर काहीना काही परिणाम पडणार आहे. मात्र कोणत्या राशींसाठी ते शुभ असेल ते आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

३ मे अक्षय तृतीयाच्या दिवशी चंद्र त्याच्या उच्च राशीत असेल सुख आणि वैभव प्रदान करणारा शुक्र मिन राशीत आहे. ह्याशिवाय शनिदेव स्वतःच्या कुंभ राशीत विराजमान असतील, तर नेहमी शुभ फळ देणारे देवगुरु ग्रहस्पती हे मिन राशीत असतील. ज्योतिषशास्त्राच्या मते अक्षय तृतीयेच्या दिवशी हे चार मोठे ग्रह अनुकूल स्थितीत आहे त्यामुळे त्यांचे महत्व वाढले आहे, आणि हाच योगायोग मेष राशींसाठी चांगला असणारं आहे.

मेष राशीचे लोक अक्षय तृतीयेच्या दिवशी लाल रंगाच्या कपड्यात लाडू बांधून दान करावेत त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. वृषभ राशीच्या लोकांनी कलश भरून जल दान करावे. असे मानले जाते कि असे केल्याने शुक्र ग्रहाचा प्रभाव कमी होतो आणि आर्थिक संकटातून तुम्हाला मुक्ती मिळेल. अक्षय तृतीयेला मिथुन राशीच्या लोकांनी मुगाची डाळ दान करावी असे केल्याने घरात सुख समृद्धी येईल तसेच घरात अचानक धनाची आवक वाढेल.

कर्क राशीवर चंद्राचे राज्य आहे अश्या स्थितीत ह्या राशीच्या लोकांनी चांदीचे मोती ह्या दिवशी धारण करावेत त्यामुळे त्यांचा चंद्र मजबूत होईल व तो शुभ फळे देईल. सिंह राशीच्या लोकांनी सकाळी लवकर उठून सकाळी सूर्याला जल अर्पण करावे आणि ह्या दिवशी गुळाचे दान करावे त्यामुळे कार्यक्षेत्रात उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे तुमची प्रगती होईल.

कन्या राशीच्या लोकांनी धनप्राप्तीसाठी अक्षय तृतीयेला पाचू रत्नाची अंगठी धारण करावी व आपण ह्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करावी. ह्यामुळे आपल्या घरात पैस्यांची कमतरता राहणार नाही. अक्षय तृतीयेला तूळ राशीच्या लोकांनी पांढरे वस्त्र दान करावेत त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची मूर्ती आपण आपल्या देवघरात बसवावी.

वृश्चिक राशीच्या लोकांनी ज्योतिषशास्त्रानुसार ह्या दिवशी प्रवळ धारण करावा, त्याच्या प्रभावाने धनलाभाचे योग बनतील व आर्थिक समस्या दूर होतील. धनु राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेच्या दिवशी हळदीच्या गाठी पिवळ्या कपड्यात गुंडाळून पूजेच्या ठिकाणी ठेवाव्यात तसेच पिवळ्या रंगाच्या वस्तू आपण ह्या दिवशी दान कराव्यात असे कल्याने घरात सुखसमृद्धी येते.

मकर राशीच्या लोकांनी ह्या दिवशी तिळाचे तेल भांड्यात घेऊन घराच्या पूर्व दिशेला ठेवावे. त्याचा त्यांना लाभ होईल. कुंभ राशीच्या लोकांनी काळे तीळ, नारळ, लोखंडाच्या वस्तू ह्यांचे दान करावे ह्या सोबतच ह्या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप अनुकूल राहील. आर्थिक परिस्थती चांगली होईल. मिन राशीच्या लोकांनी ह्या दिवशी पिवळ्या रंगाच्या कपड्यात पिवळ्या रंगाची फुले बांधून घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवावी असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदेल.

तर मित्रांनो ह्या होत्या काही गोष्टी त्या त्या राशींसाठी त्यांनी त्यानुसार दान करावेत त्याचा फायदा त्यांना नक्कीच होईल. तसेच मित्रांनो लेख जर आवडला असेल लेखातील माहिती आवडली असेल तर आमचा आजचा लेख तुमच्या मित्रांना शेयर नक्की करा, तसेच कॉमेंट मध्ये तुमची रास कोणती आहे हे नक्की लिहा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट