धार्मिक

साडेतीन शुभ मुहूर्त अक्षय तृतीया, नक्की खरेदी करा या ५ वस्तू.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो अक्षय तृतीया वर्षभरातील साडेतीन मुहूर्ता पैकी एक. ह्या दिवशी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते, भगवान श्री हरी विष्णूंची देखील पूजा केली जाते. माता लक्ष्मीची आणि विष्णूंची एकत्रित पूजा केल्याने घरात सुख समाधान आणि समृद्धी नांदते. धन वैभव ह्याची कमतरता कधीच कमी पडत नाही.

अशी मान्यता आहे कि ह्या दिवशी सोने खरेदी केल्याने ते अक्षय टिकते. मित्रांनो सोन्यासोबतच अश्या काही वस्तू आहेत ज्यांची खरेदी आपण अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जरुर करावी. ह्या वस्तू माता लक्ष्मीस प्रसन्न करवणाऱ्या आहेत आणि ज्या घरात ह्या वस्तू असतील त्या घरात माता लक्ष्मीची अस्सीम कृपादृष्टी कायम असते. चला तर आपल्या लेखात पाहुयात कोणत्या आहेत त्या वस्तू.

मित्रांनो आपण ह्या दिवशी लाक्षिमीच्या पादुका पावले आपण अवश्य खरेदी करून घरात आणाव्यात. तसे तर आपण आपल्या घरातील उंबरठयावर लक्ष्मी पावले लावली असतीलच लावली नसतील तर आपण ह्या दिवशी आणून ह्या उंबरठयावर नक्की लावा. आणि हि लक्ष्मीची पावले घरात आत येणारी असावीत. जे लोक सोने खरेदी करणार असतील त्यांनी हि पावले सोन्याची खरेदी करा व नित्यनियमितपणे ह्यांची पूजा आपण करा. मित्रांनो ह्यामुळे आपल्या घरातील दरिद्रता कायमची दूर होते.

आपण ह्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंचे आवडते कासव देखील खरेदी करू शकता. हे अगदी कोणत्याही प्रकारचे म्हणजे तांब्याचे असते, काचेचे असते, सफ्टीकांचे असते असे कोणतेही आपण आपल्या घरात घेऊन या व देवघरात ठेवून त्याची आपण दररोज पूजा करावी. खूप लोकांच्या घरी धन असते परंतु त्या धनाचा लाभ आपल्याला घेता येत नाही केवळ माता लक्ष्मीची कृपा असून चालत नाही तर त्या भगवान श्री हरिंची कृपा असणे देखील फार महत्वाचे असते म्हणून असे विष्णुस्वरूप कासव आपण आपल्या देवघरात आणून त्याची स्थापना करावी.

मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे आपण ह्या दिवशी आपण दक्षिणावरती शंख, हा शंख आहे तो भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्याचा वापर केला जातो आणि घरात आणण्यासाठी अक्षय तृतीयेचा दिवस आणि धनत्रयोदशी चा दिवस अतिशय उत्तम मानला जातो. ज्या घरात हा शंख असेल त्या घरात धनसंपत्ती, संपदा नेहमी घरात राहते ती कधीही कमी पडत नाही.

मित्रांनो चौथी गोष्ट पारद ची लक्ष्मी नारायणाची मूर्ती आपण ह्या दिवशी खरेदी करावी. ह्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी तर येईलच तसेच घरात धन देखील कमी पडणार नाही. म्हणून ह्या दिवशी आपण लक्ष्मीनारायणाच्या पारद मूर्तीची खरेदी आपण अवश्य करावी व त्यांची घरात आणल्यानंतर पंचोपचार पद्धतीने पूजा अवश्य करावी.

मित्रांनो पाचवी गोष्ट म्हणजे श्री यंत्र हे जे यंत्र असते ते साक्षात माता लक्ष्मीचा कृपाआशीर्वाद असणारे हे यंत्र घरात ठेवल्याने घरात कसलीच धनसमस्या राहत नाही. घरात आपण माता लक्ष्मीचे हे श्री यंत्र स्थापित केले कि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या प्राप्त होतो. तर मित्रांनो ह्या सर्व वस्तूंपैकी आपण एखादी गोष्ट जरी घरात खरेदी करून आणली तरी चालेल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट