लाईफस्टाईल

सर्व मनोकामना पूर्ण होतील, फक्त होळीच्या रात्री करा हा लवंगाचा एक उपाय.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, मित्रांनो होळी आपला सर्वांचा आवडता सण ह्या दिवशी हिवाळा संपून उन्हाळा लागतो. शेतात गहू, हरभरा अशी पिके त्यांना बहार आलेला असतो अशी पिके छान वाऱ्यवार डोलत असतात. ह्यावेळी नेमकी उष्ण वातावरणाची सुरवात होत असल्याने ह्या उष्ण गरम हवामानापासून आपल्याला थोडासा अराम मिळावा तसेच आपल्या जीवनातील मरगळ अगदी बाजूला झटकून ह्या दिवशी रंग तसेच पाण्याचे फवारे उडवले जातात. ज्यामुळे आपला उत्साह वाढतो.

होळीचा सण हा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. ह्यावर्षी हा सण गुरुवारी म्हणजेच १७ मार्च ला केला जातोय. होळीच्या दिवशी रात्री होलिकादहन केले जाते म्हणजे वाईट व चुकीचे काय आहे ते सर्व नकारात्मक भावना शक्ती जाळल्या जातात व चांगले जे काही आहे ते ठेवले जाते. ह्यादिवशी टोनेतोटके करण्यासाठी तर खूप विशेष दिवस मानला जातो. असे मानले जाते कि ह्यादिवशी केलेले उपाय हे अतिशय प्रभावशाली असतात. तसेच आपल्याला त्यांचा परिणाम लवकर जाणवून येतो म्हणून ह्या दिवशी अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच आपल्या इच्छा किंवा मनोकामना पूर्ण करण्यासाठी काही ज्योतिषी उपाय आपण जरूर करावेत.

ह्यादिवशी जर आपण हे उपाय केले नाही तर संपूर्ण वर्षभर आपल्याला हे उपाय करता येत नाही. म्हणून ह्या दिवशी आपण हे उपाय करून आपले सर्व बाधा अडीअडचणी दूर करता येतात. चला जाणून घेऊयात ते उपाय कोणते. पहिला म्हणजे आपण होळीच्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर आपण दोन अखंड लवंगा घ्याव्यात व नंतर त्या लगेचच आपण तुपात भिजू घालाव्यात. दिवसभर त्या भिजूच ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपण रात्री होळीपूजनाला जाताना एक विड्याचे पान त्यानंतर भिजवलेल्या लवंगा व बत्याशे असे सर्व सोबत घेउन जावे पूजा झाल्यानंतर आपण विड्याच्या पानात ह्या लवंगा व बत्ताशे ठेवून ते आपण होळीमध्ये अर्पण करायचे आहे.

त्यानंतर आपण होळीला ३ प्रदक्षिणा घालाव्यात त्यानंतर आपण एक नारळ घेऊन ते न सोलता आपण तसेच होळीत अर्पण करावे. त्यानंतर आपण होळीसमोर बसून हात जोडून प्रार्थना करायची आहे जी काही इच्छा असेल ती आपण पूर्ण होण्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे. ह्या उपायामुळे आपली जी काही मनोकामना असेल ती नक्कीच पूर्ण होईल. पुढील उपाय ज्यांच्या विवाहामध्ये जमण्यास अडचणी येत असतील त्यांच्यासाठी आहे.

मित्रांनो होळीच्या दिवशी सकाळी आपण स्नान झाल्यानंतर आपण एक विड्याचे पण घेऊन त्यावर एक सुपारी व एक अखंड हळकुंड घेऊन महादेवांच्या मंदिरात जावे. विड्याच्या पानावर सुपारी व हळकुंड ठेवून असे पान आपण महादेवांना अर्पण करावे व मनातल्या मनात आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा अशी प्रार्थना करायची आहे. हा उपाय खूप प्रभावी आहे, आणि हा उपाय होळीच्या दिवशीच केला जातो म्हणून विवाह जमण्यासाठी हा उपाय तरुण तरुणींनी जरूर करून पहा.

मंदिरात घरी येताना आपण मागे न वळून पाहता सरळ घरी यावे. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट