घरगुती उपाय

केसांच्या सर्व समस्या तसेच गुडघेदुखी,कंबरदुखी, वातविकार या समस्यांसाठी हा एक पदार्थ रोज खा …

केसांच्या सर्व समस्या तसेच गुडघेदुखी कंबरदुखी, वातविकार या समस्यांसाठी आपण हा पदार्थ बनवणार आहे हा या सर्व समस्यांसाठी उपयुक्त आहे . तसेच हा रोज खाल्यानी गुडघेदुखी कंबरदुखी, वातविकारतसेच केसांसाठी गुणकारी आहे. तो आपण पुढीलप्रमाणे बघुयात .

या पदार्थासाठी आपल्याला १कप मेथी दाणे लागणार आहेत. ते आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. या नंतर पाव कप खसखस घ्यायची आहे आणि खसखस पण भाजून घ्यायची आहे. तसेच पाव कप तीळ घ्यायचे आहेत आणि ते हि भाजून घ्यायचे आहेत .त्यानंतर आळीव पाव कप घ्यायचे आणि तेही भाजून घ्यायचे आहेत. आणि एक वाटी साजूक तूप घ्यायचे आणि त्यातील एक चमचा तूप घेऊन त्यामध्ये १ कप सुक खोबरं घ्यायचे आणि ते तुपावर मस्त भाजून घ्यायचे आहे. अजून एक चमचा तूप घेऊन त्यामध्ये १ कप खारीक घेतली आहे ती सुद्धा भाजून घेण्याची  आहे. एक चमचा तुपात १ कप मखाने घेऊन ते क्रिस्पी होई पर्यंत भाजून घायचे आहेत . आता आपण २चमचे तूप घेऊन त्यात आपण बदाम,पिस्ता काजू आणि मनुके भाजून घेणार आहोत ,आणि पाव कप पेक्षा जास्त डिंक घेऊन तो आपण मस्त तुपात फुलवून घेणार आहोत.

मित्रानो तर आता आपण हे सर्व भाजून घेतले आहेत ते मिक्सर मध्ये वाटून घेऊयात ,सर्व प्रथम खोबर बारीक करून घेऊ त्यानंतर खारीक बारीक करू घेऊ , त्याप्रमाणे मखाने, खसखस, तीळ, हे सगळे बारीक घायचा आहे . तसेच भाजून घेतलेले मेथी दाणे आपण मिक्सवर बारीक करू चालून घेणार आहोत त्यातला जाडसर भाग आपल्याला नको आहे . आता कढई घेऊन त्यात २ चमचे तूप घेऊन १कप बेसन आहि १कप गव्हाचे पीठ घेऊन ती मंद आचेवर आपण भाजून घेणार आहोत, ते मस्त तांबूस रंग होई पर्यंत भाजून घेतल्यावर त्यात २ चमचे दूध घालणार आहोत त्यामुळे हे पीठ आपल्या टाळ्याला चिटकत नाही म्हणून दूध घालायचं आहे.दूध टाकण्याचा दुसरा फायदा म्हणजे मेथी जर का कडक असेल तर दूध मुळे ती थोडी माऊ पडते. इतर सर्व घटक एकत्र करून घेण्यासाठी मिक्सर मध्ये टाकून बारीक करायचे आहे. यानंतर यात थोडे मनुके टाका. सर्व गोष्टी एकत्र करून घ्या इतर सर्व बारीक केलेले पीठ सुद्धा एकत्र करून घ्या. या मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा पिठाचा रंग चॉकलेट सारखा होत नाही तोपर्यंत मिक्स करत रहायचे आहे.

सर्व पीठ एकत्र झाल्यानंतर त्यात थोडे जयफल त्यात टाकायचे आहे. शक्यतो हातानी सर्व घटक एकत्र करून घ्या. दोन चमचे तूप आणि बारीक केलेला गूळ त्यात थोडे पाणी टाकून त्याला एक उकळी द्या. अर्थात गुळाचा पाक तयार करायचा आहे. तो तयार केलेल्या मिश्रणात टाकायचा आहे जेणेकरून आपल्याला लाडू वळायला मदत होईल. गरम असेपर्यंतच लाडू वळायला सुरवात करा जेणेकरून लाडू व्यवस्थित वळले जाईल..आपण हे बनवलेले लाडू रोज सकाळी एक खायचा आहे त्यामुळे आपल्या सगळ्या समस्या दूर होतील . तर मित्रानो हे पौष्टिक लाडू तुम्ही नक्की करून बघा .

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट