भारतीय महिलांच्या कपाळावरती आणि भागात कुंकू भरण्याचे खुप मोठे महत्व आहे. लग्न झालेल्या महिला आपल्या कपाळावरती किंवा भांगात कुंकू लावतात किंवा भरातात. विवाहित असण्याचे चिन्ह म्हणजे भागात कुंकू भरणे होय. भारतीय हिंदू पद्धतीने लग्न केल्यास त्यावेळेस एक कार्यक्रम असतो तो म्हणजे भांगेत कुंकू भरण्याचा. त्या नंतर विवाह विधी पूर्ण झाले असे मान्यता येते.
यामुळेच प्रत्येक स्त्री हि लग्ना नंतर आपल्या कपाळावरती कुंकू लावते किंवा भेगेत कुंकू भरते. पण सध्या आधुनिक परंपरा नवनवीन फॅशन यामुळे जुन्या परंपरा कमी प्रमाणत पाळल्या जातात. पण असे मानले जाते कि भेगेत कुंकू भरणे यामागे धार्मिक कारणे नसून यामागे शास्त्रीय व वैज्ञानिक कारणे सुद्धा खुप मोठ्या प्रमाणत आहे. धार्मिक मान्यते नुसार जर का स्त्रियाने भागेत कुंकू लावले नाही तर त्यांच्या पतीला खुप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
कोणत्याही भागेत जर का कुंकू लावायचे झल्यास ते स्वतःच्या पैशाने घ्यावे इतरांच्या पैशाने घेतलेले कुंकू कधीही लाऊनये. त्याच सोबत इतरांचे कुंकू घेऊन स्वतःच्या भेगेत कुंकू भरू नये. यामुळे पतीला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. त्याच सोबत इतरांनी गिफ्ट दिलेले कुंकू सुद्धा त्याचा वापर करू नये.
कुठल्याही स्त्रीने अंघोळ केल्या शिवाय कुंकू आपल्या भांगेत भरू नये. अंघोळ केल्यावर देवाची पूजा करून किंवा देवाचे दर्शन घेऊनच भांगेत कुंकू भरावे. माता पर्वती यांचे स्मरण करून कुंकू लावावे यामुळे पतीला दीर्घ आयुष्य मिळते. तसेच घरात सुतक चालू असेल अशा वेळी भागेत कुंकू लावूनये. कुंकू सतत खाली सांडणे हे खुप अशुभ मानले जाते. यामुळे कुंकू लावताना योग्य ती काळजी घ्यावी.
कुंकू साठी एक छोटीशी डबी ठेवावी आणि त्यात एक रुपयांचे नाणे ठेवावे. यामुळे देवी पार्वतीचा आशीर्वाद नक्की प्राप्त होतो. तसेच पतीने जर का पत्नीच्या भागेत रोज कुंकू भरल्यास दोघानाच्या प्रेमात खुप वाढ होते. तसेच स्वप्नांत कुंकू दिसत असेल तर खुप शुभ मानले जाते. कुंकू नेहमी स्वतःच्या कपाळाला लावताना किंवा भेगेत भरताना नेहमी अनामिक बोटाने भरावे.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.




