गवती चहा पिण्याचे फायदे
फूड

गवती चहा पीत असाल तर आजचा लेख अवश्य वाचा.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, हिरवेगार असे दिसणारे गवत त्यालाच गवती चहा असे देखील म्हणतात अश्या ह्या हिरव्या गवती चहाला आयुर्वेदात एक वेगळेच महत्व आहे. ह्यालाच इंग्रजी मध्ये लेमन ग्रास असे देखील म्हणतात. आणि ह्याच गवती चहाचे आपण फायदे आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. गवती चहा म्हणजे नेमके काय हे आपण जाणून घेऊयात.

गवती चहा म्हणजे cymbopogon citratus अशी हे गवतासारखी दिसणारी वनस्पती साधारण पणे १ ते २ मीटर एवढी उंचीपर्यंत वाढते. ह्याची पाने टोकाला निमुळती असतात आणि ह्याचा रंग हिरवा असतो. ह्या गवताची मुळे एकदम तंतुमय असतात. हा गवती चहा खास करून आशिया, आफ्रिका आणि यूरोप ह्या खंडात जास्त आढळतो भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक ह्या राज्यात जास्त गवती चहाचे उत्पादन होते. चला आता जाणून घेऊयात गवती चहाचे आपल्या शरीराला काय फायदे होतात.

गवती चहा पिण्याचे फायदे

गवतासारख्या दिसणाऱ्या ह्या गवती चहामध्ये व्हिटॅमिन अ व्हिटॅमिन सी फॉलिक ऍसिड, झिंक, मॅग्नेशिअम, कॉपर, तसेच आयर्न ची मात्र भरपूर प्रमाणात असते. अश्या गवती चहाच्या काड्यांचे सेवन केल्याने. पोटदुखीच्या समस्या कायमच्या दूर होतातच. सोबतच कोलेस्ट्रॉल देखील कंट्रोल मध्ये राहते. दुसरा फायदा असा आहे कि ह्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. म्हणजेच ह्या काड्यांच्या सेवनाने. किडनी लिव्हर, ब्लॅडर ह्या मधील विषाणूंची स्वछता होते.

तिसरा फायदा म्हणजे ह्यामुळे कफ सर्दी ह्यांसारख्या आजारांवर गवती चहाचा काढा खूप गुणकारी असतो. तुमचा सर्दी खोकला घालवण्यात हे मदत करते. चौथा फायदा म्हणजे ह्यामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडेन्टमुळे आपली इम्युनिटी वाढन्यास मदत होते. पाचवा फायदा आहे ते म्हणजे कॅन्सर सारख्या रोगांवर लढण्यासाठी गवती चहा खूप फायदेशीर ठरतो.

सहवा फायदा गवती चहा चहामध्ये जरी टाकून पिला तरी आपल्या शरीरात एक ऊर्जा येते, आपला मानसिक ताणतणाव तसेच थकवा निघून जातो. सातवा फायदा म्हणजे बाजारात ह्या गवती चहाचा अर्क देखील मीळतो त्या अर्क चा उपयोग आपण वातविकार असतील सांधेदुखी वर हा गवती चहा खूप उपयोगी आहे. ह्या गवती चहाच्या पानांचा काढा हा ज्वरनाशक म्हणजेच तापनाशक असतो तो ताप कमी करण्याचे काम करतो. गवती चहाची पाने आपण नुसती ती धुवून चघळयास आपल्या तोंडाची दुर्गंधी दूर होते. आणि तोंडात जंतू नष्ट होण्यास मदत होते, दात आणि हिरड्या मजबूत होतात.

हे पण वाचा :-  दूध पिण्याचे काही नियम आहेत. तुम्ही जर रोज दूध पीत असाल तर हे नियम नक्की पहा.

गवती चहाचा उपयोग घरगुती आयुष्यत देखील होतो जसे कि धान्यात कीड लागू नये म्हणून गवती चहाच्या पानांचा उपयोग केला जातो. ह्याच्या पानांचा सुगंधी तेल बनवण्यासाठी देखील उपयोग होतो. हे झाले गवती चहाचे फायदे, मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या कि कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा तोट्याचा असतो. ह्याच्या अतिवापरामुळे आपल्याला जुलाब देखील लागू शकतात.

अतिप्रमाणात गवती चहाचा वापर केल्याने तोंड कोरडे पडते म्हणून चहाचे अतिप्रमाण राहिल्यास भूक क्षमते. त्यामुळे गवती चहा नक्की घ्या मात्र मापात घ्या. मित्रांनो आजचा लेख आवडला असेलच तर लाइक व शेयर करायला विसरू नका, धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.