कढीपत्याचा मसाला बनवण्याची एक सोपी पद्धत
फूड

कढीपत्याचा मसाला बनवण्याची एक सोपी पद्धत

कढीपत्ता हा खूप गुणकारी असतो. कढीपत्याचा एक वेगळा सुगंध असतो. कढीपत्ता हा औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्यामुळे तो स्वयंपकात हि जास्त प्रमाणात वापरला जातो, कढीपत्ता खाल्लेला चांगला असतो पण तो लहान मुले तसेच मोठे सुध्दा काढून टाकतात त्यामुळे कढीपत्त्याचा मसाला बनवून तो वापरला तर त्याचा आपल्याला फायदा होतो.कढीपत्ता खूप दिवस टिकून ठेवता येत नाही तो जास्तीत जास्त ४ ते ५ दिवस राहतो नंतर काळा पडतो तर आपण त्याचा मसाला बनवला तर तो अधिक काळ टिकतो. मित्रानो आता आपण कढीपत्त्याच्या मसाला कसा तयार करायचा ते बघुयात.

कढीपत्याचा मसाला बनवण्याची कृती –

आपण प्रथम चार मोठ्या वाट्या एवढा कढीपत्ता घेणार आहोत. कढीपत्ता स्वच्छ करून तसेच तो धुवून आणि पूर्ण कोरडा करून घेणार आहोत. आणि तो आपण वाळवून घेणार आहोत ,म्हणजे आपला मसाला खूप काळ टिकेल. आता आपण दोन चमचे तीळ घेणार आहोत. एक चमचा मीठ घेणार आहोत, तसेच एक चमचा मोहरी घेणार आहोत , आणि दोन चमचे धने घेतले आहेत, आणि दोन चमचे डाळ घेतलेले आहेत, एक चमचा मेथी दाणे आणि एक चमचा जिरे घेतलेले तसेच चार लाल मिरच्या घेयच्या आहेत आहेत हे सगळे साहित्य आपल्याला मसाला बनवण्यासाठी लागणार आहेत.

मित्रांनो आपण आता कढीपत्याचा मसाला तयार करू,आता हे सगळे घेतलेले साहित्य आपण भाजून घेणार आहोत,आता कढईत थोडं तेल टाकून डाळ ,धने,तीळ ,मोहरी,जीर,मेथी दाणे सगळे पदार्थ आपण खमंग भाजून घेऊयात आणिआता आपण कढीपत्ता पण भाजून घेणारे आहोत. तो कढीपत्ता कडक होई पर्यंत भाजून घेयचा आहे,आणि चार लाल मिरच्या पण थोड्या तेलात भाजून घेयच्या आहेत. आता हे भाजून घेतलेले साहित्य एकत्र करून मिक्सरच्या भाड्यात घेऊन त्याची बारीक पूड करून घेयची आहे. आता तयार झाला आपला कढीपत्याचा मसाला हा मसाला आपण वारन ,सांबर अस्या अनेक पदार्थत वापरून त्या पदार्थाची चव वाढवू शकतो तसेच हा कढीपच्या मसाला बराच काळ टिकतो.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट