Uncategorized

अंगारक संकष्टी चतुर्थी ह्या दिवशी करा अशी पूजा व करा हा एक उपाय मागाल ते मिळेल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो २ मार्च रोजी येणारी अंगारक संकष्टी चतुर्थी बद्दल आपण आजच्या लेखामध्ये माहिती घेणार आहोत जसे कि त्याचे महत्व पूजा विधी कशी करावी व गणपती बाप्पाना लवकर प्रसन्न करण्यासाठी करावयाचे उपाय आपण पाहणार आहोत ज्यामुळे आपले सर्व विघ्न आपल्या सर्व अडचणी दूर होतील. ह्यावेळची २ मार्च रोजी आलेली अंगारक संकष्टी चतुर्थी ह्या दिवशी विशेष महायोग आहे कारण हि मंगळवारी अली आहे आणि माघ महिन्यात अली आहे. माघ महिन्यात येणारी अंगारक संकष्टी चतुर्थी हि खूप वर्षातून असा संयोग जुळून येतो म्हणून ह्या दिवशी मनोभावाने केलेलं व्रत आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करते व त्या व्यक्तीवर सदैव गणपती बाप्पनचा आशीर्वाद राहतो.

ह्या दिवशी चंद्रदोय आहे ९:४७ मिनीटांनी होणार आहे तर ह्याचा प्रारंभ २ मार्च सकाळी ५:४६ मिनीटांनी होणार आहे. ह्या दिवशीचे व्रत तुम्ही अगदी सकाळपासून करावे व फक्त फलाहार करावा तो चंद्रदोय होईपरेंत. आणि एखाद्याला उपवास व्रत करणे शक्य नसल्यास किंवा आजारी असल्यास त्या व्यक्तीने सतत गणपती बाप्पांचं जाप करावा अशे केल्याने देखील तुम्ही पुण्य मिळेल गणपती बाप्पांची कृपादृष्टी आपल्यावर राहील.

ह्यादिवशी आपण सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवतेला अर्घ्य द्याचे आहे आणि त्या पाणी देताना त्या पाण्यात आपण एक लाल जास्वंदीचे फुल त्यात घालून ते पाणी आपण सूर्याला अर्घ्य द्याच आहे. हे देत असताना आपण एक मंत्राचा जाप करायचा आहे तो म्हणजे ओम घृणि सूर्याय नमः ! आणि ह्या मंत्राचा जाप केल्यांनतर आपण आपल्या उजव्या हातात जल, फुल, व अक्षदा घेऊन व्रताचा संकल्प करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये म्हणायचं आहे कि मी आपल्या स्वतःच नाव आपले गोत्र म्हण्याच आहे त्यानंतर म्हणा कि हे श्री गणेशा मी आज तुझे व्रत अगदी भक्ती भावाने करणार आहे तरी ह्या व्रतास संपूर्ण करावे. अश्या प्रकारचे संकल्प करायचा आहे. त्यानंतर आपण विधिवत गणेशाच्या मूर्तीची पूजा करावी त्यांना दुर्वा वाहाव्यात.

पूजा करत असताना आपण ओम गण गणपतेये नमः ! ह्या जपाचा जाप करावा. उपाय स्वरूप आपण ११ दुर्वा आपण अर्पण कराव्यात. जेणेकरून आपल्या सर्व अडचणी दूर होतील. तसेच नेवैद्य म्हणून आपण श्री गणेशांना २१ मोदकाचा नैवैद्य दाखवावा व त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व बाधा दूर होतील. तसेच सायंकाळी आपण श्री गणेशांचे अशीच पूजा करून. व जेव्हा चंद्रदोय होईल तेव्हा आपण चंद्राचे वजन करायचे आहे त्याला हि पाणी अर्पण करायचे आहे व त्यावेळी ओम सोम सोमय नमः ! ह्या मंत्राचा जाप करायचा आहे. तसेच अर्घ्य देताना त्या लोट्यामध्ये आपण थोडे दूध घालून तेही आपण चंद्राला अर्पण करायचे आहे. फुल हळदी कुंकू अर्पण करून आजचे जे आपण केलेलं व्रत आहे ते फलदायी करण्याची प्रार्थना आपण चंद्रदेवाला करायचीय आहे.

तर ह्या दिवशी एक उपाय म्हणून एक दिव्य मंत्राचा उच्चरण आपण करायचे आहे जेणे करून आपल्या सर्व अडचणी दूर होतील तो मंत्र आहे. गजाननं भूतगणादि सेवितं, कपित्थ जम्बूफलसार भक्षितम् , उमासुतं शोक विनाशकारणं, नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् ॥ ह्या मंत्राचा जाप नक्की करा ज्याच्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पांची कृपा नक्की होईल. तसेच ह्या दिवशी आपण एक चार बेलपत्राची पाने आपण पूजा करत असताना गणेशजींच्या चरणावर ठेवायची आहेत व ती ठेवत असताना आपण ओम गण गणपतये नमः ह्या मंत्राचा जाप करायचा आहे. आणि सकाळी उठून ती बेलाची पाने आपण आपल्या तिजोरी मध्ये नेहून ठेवायची आहेत. ज्यामुळे आपल्या कर्ज विषयी तसेच पैस्याच्या काही समस्या असतील तर त्या दूर होतील. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट