उन्हाळ्यात फिरायला जण्यासाठी सुंदर ठिकाणे ,उन्हाळ्यात फिरायला जण्यासाठी सुंदर पाच ठिकाणे ते सुध्दा महाबळेश्वर आणि लोणावळा सोडून. , five beautiful places to go for summer walks
लाईफस्टाईल

उन्हाळ्यात फिरायला जण्यासाठी सुंदर पाच ठिकाणे ते सुध्दा महाबळेश्वर आणि लोणावळा सोडून.

महाराष्ट्रात उन्हाळा सुरु झाला कि काय करावे काही समजत नाही. तापमानाचा पार हा वाढता वाढत जातो. उन्हाच्या झळ्या अशा काही अंगाला लागतात कि घराबाहेर निघावे सुद्धा वाटतं नाही. आणि जर का तितक्यात लाईट गेली तर विचारायची सोय नाही. सध्या काही दिवसा पासून उष्णतेची पातळी मागील काही रेकॉर्ड तोडेल कि काय असे वाटायला लागले आहे.

उन्हाळ्यात फिरायला जण्यासाठी सुंदर ठिकाणे

उन्हळ्याच्या सुट्या म्हंटले कि बऱ्याच लोकांचे फिरायला जायचे प्ल्यान तयार करतात त्यातून थंड हवेचे कोणते ठिकाण आहे याबद्दल माहिती पण घेत असतो. महाराष्ट्रात काही ठराविक असे ठिकाण आहेत त्या ठिकाणी बहुतेक सर्व जण जाऊन आलेले आहेत. किंबहुना थंड हवेचे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर, लोणावळा आणि माथेरान येवढेच ठिकाण लोकांना माहीत आहेत.

पण या पेक्षा सुद्धा सुंदर आणि चंगली ठिकाणे महाराष्ट्रात आहेत. बहुतेक कमी लोक या ठकाणी फिरायला जातात. पण त्या ठिकाणी असलेला निसर्ग हा खुप सुंदर आहे शिवाय त्या ठिकाणी शांतता सुद्धा खुप आहे. अशी काही ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही उन्हाळ्यात फिरायला जाऊ शकतात. ज्या लोकांना तीच तीच ठिकाणे बोर झाली आहेत त्यानी हि नवी ठिकाणीजायला हरकत नाही.

पहिले आहे काशीद. समुद्र किनारी असलेले हे एक कोकणातील एक ठिकाण. स्वच्छ निळा समुद्र आणि तिन्ही बाजूनी असलेले डोंगर आणि त्या दाट हिरवी गार झाडी. हि चार महिने त्या ठिकाणी जाण्यासाठीचा चांगला काळ. त्या ठिकाणी गेल्यावर काही चांगले ठिकाण आहेत जे आवर्जून पहावेसे वाटतात. जसेकी काशीद बीच , मुरुड जन्जीरा, फणसाड पक्षी अभिअरण्य, त्याच सोबत त्या ठिकाणी इतर गोष्टींचा आंनद घेता येतो.

दुसरे आहे मालवण. सुंदर बीचेस, त्याच सोबत लांब पर्यंत असलेले ब्याक वॉटर पट्टा त्याच सोबत या ठिकाणी सर्वात जास्त माश्यांच्या व्यपार होणारे ठिकाण म्हणून सुद्धा ओळखले जाते. पावसाळ्याचे काही दिवस सोडून दिल्यास इथे फिरायला जाऊ शकतात. या ठिकाणी इतर सुद्धा खुप सुंदर ठिकाण आहेत. मालवण बीच, तारकर्ली बीच रॉक गार्डन, देवबाग बीच या सारखी असंख्य ठिकाण आहेत. त्याच सोबर त्या ठिकाणी स्कुबा ड्रायविंग सारख्या काही इतर गोष्टी सुद्धा तुम्हला करायला भेटू शकतात.

तिसरे आहे पाचगणी पाच डोंगरात बसलेले हे सुंदर ठिकाण. तसे पहिले गेल्यास ब्रिटिश काळापासून हे ठिकाण थंड हवेचे ठिकण म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच सोबत जवळ महाबळेश्वर आहे. टेबल लँड, मॅप्रो फार्म्स, लिंगमला फॉल्स, धोम धरण, यासारखे विविध ठिकाण आहेत ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात. त्याच सोबत पॅराग्लायडिंग आणि सायकलींग या यासारखे खेळांचा आनंद घेऊ शकतात.

तोरणमाळ हे एक आदिवासी संस्कृतीचे प्रतीक आहे. त्याच सोबत छोटे छोटे तलाव तसेच गुहा आणि काही व्हिव पॉईंट आहे. तसेच तोरणमाळच्या आजूबाजूला सात मोठ मोठे टेकड्या आहेत. पावसाळा सोडून या ठिकाणी भेट देण्याची सर्वात चंगली वेळ आहे. यशवंतन तलाव लोटस लेक, मछिंद्र नाथ गुहा यसारखी अजून काही चंगली ठिकाण आहेत.

या काही ठिकांसोबत इतर ठिकाणी सुद्धा जाऊ शकतात जसे कि भांडार दरा, इगत पुरी, कर्नाळा, कोरोली आणि अबोली अशा ठिकाणी सुद्धा जाऊ शकतात. तुम्ही कोणत्या ठिकाणी जाणार आहेत हे नक्की कळवा तसेच अजून अशी कोणती ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी उन्हळ्यात फिरायला आपण जाऊ शकतो हे हि सांगा .

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट