धार्मिक

आपल्या घरातील कुटुंबियांसाठी करा हे सोपे उपाय, सुख, समृद्धी, शांती लाभेल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपल्या घरासाठी कुटुंबासाठी सोपे तोडगे, सोपे उपाय तुम्ही आपल्या घरासाठी नक्की करा. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो, आणि सूर्योदय अथवा सूर्यास्तासमयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून जाते. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते.

कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीचे पान तोंडात टाकावे ह्यामुळे पैशाअभावी अडकलेली कामे पूर्ण होतात. घरात, दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या श्री कृष्णाची तसवीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी असे केल्याने आपल्यावर आर्थिक संकट कधीच येणार नाही. आपल्यावरती कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही.

घरामध्ये सूर्योदय व सूर्यास्ताआधी झाडू मारावा त्यामुळे घरात कधीच दारिद्र्य येत नाही. आपल्या कुलदेवतेचे आपण वर्षातून एकदा का होईना दर्शन घ्यावे, अभिषेख व पूजा ह्याची टाळाटाळ करू नये. तुमच्यकडे पैस्याचा योग्य सतत वाहत राहील. घरात नवीन केरसुणी आणल्यानंतर तिला हळद कुंकू वाहावे तिची पूजा करावी व नंतर ती वापरावी. तिला पाय लावू नये व ती सहज बाहेच्याच्या नजरेला येईल अशी ठेवू नये. व आपल्या घरात दिवे लावल्यानंतर कधीही झाडू मारू नये.

घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्यकाळी तिन्हीसांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्या वेळेस घरात धूप दाखवावा. रोज सकाळी पहिली भाकरी गाईला दुसरी कुत्र्याला व तिसरी छतावर पक्ष्यांना ठेवावी ह्यामुळे पितृदोष नाहीसा होतो. व पितृदोषाने होणारा त्रास देखील नाहीसा होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तुदोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे शास्त्रसंमत नाही. तोडफोड केल्याने सगळ्यात मोठा म्हणजे वास्तुभंगाचा दोष लागतो.

घरात काटेरी रोपटे जसे कि कॅकटस लावल्याने घरात विनाकारण वादविवाद होतात, अगदी छोट्या कारणांवरून भांडणे होतात म्हणून काटेरी रोपे घरात लावणे टाळावे . रोख रक्कम आपल्या हातात पडली कि ती घरी आणून सर्वप्रथम देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी.

तर मित्रांनो हे काही सोप्पे तोडगे आहेत आपल्या रोजच्या जीवनात नक्की अमलात आना, तुम्हाला नक्की सुख, समुद्धी, आणि शांती लाभेल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट