धार्मिक

आपल्या सर्व समस्या दूर करील हा उपाय, मंगळवारी करा फक्त हा एक उपाय.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपल्या घरात कोणतीही बाधा असेल, तुमचा व्यवसाय चालत नसेल तर, आपली आर्थिक परिस्थिती डगमगली असेल पैसे टिकत नसतील, किंवा तुमचा कोणताही संकटे असतील तर ह्या सर्वावर एकाच उपाय आहे. हा उपाय आपल्याला प्रेत्येक मंगळवारी करायचा आहे. आपल्याला ह्या उपायांमध्ये एक दिवा लावायचा आहे आणि तो हि ४ वाती असलेला दिवा आपल्याला लावायचा आहे आणि हा दिवा आपल्याला सूर्यास्तानंतर म्हणजे सूर्य मावल्यानंतर लावायचा आहे. मंगळवार हा श्री हनुमानाचा वार मानला जातो. आणि ह्या दिवशी हा उपाय हनुमानाच्या मंदिरात जाऊन केला तर अति उत्तम. तुम्हला ह्या उपायाचे फळ अतिशय लवकर मिळेल. तुमच्याकडे जर मारुतीचे मंदिर नसेल तर तुम्ही घरी एखादी प्रतिमा आणून त्यासमोर तुम्ही हा दिवा लावू शकता.

मित्रांनो ह्याची पूर्ण विधी काई आहे ते आपण पाहुयात. मित्रांनो ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहेत त्या दिवशी तुम्ही रात्री दिवा लावायच्या आधी आपण स्नान करून घ्यावे. हनुमानांना लाल रंग आवडता आहे त्यामुळे तुम्ही लाल रंगाचा दिवा तसेच लाल रंगाच्या वाती घेतल्या तर अति उत्तम तसेच आपण लाल रंगाचे कपडे जरी परिधान केले तरी शुभ आहे. लाल वाती बनवायच्या कश्या तर मित्रांनो खूप सोपं आहे आपण जो कापूस घेतो त्याला आपण कुंकू आणि पाणी लावून मिश्रण करून त्या मिश्रणामध्ये ह्या वाती बनवायच्या आहेत. आणि दिवा लावताना आपण तेल हे मोहरीचे तेल वापरायचे आहे. हे तेल वापरल्याने आपल्याला फायद्याचे असते आपला उपायाची लवकर फळ प्राप्ती होते. आणखी एक गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे एक लवंग. तर हि अशी सामग्री आपल्याला घ्याची आहे. एक दिवा, ४ लाल रंगाच्या वाती, मोहरीचे तेल आणि एक लवंग.

मित्रांनो हनुमाच्या मंदिरात जाताना आपण फुटण्याचा प्रसाद घेऊन जा ते हनुमानाला प्रिय आहे. सर्वात आधी मंदिरात गेल्यानंतर दिवा लावायचा आहे त्याचा चारीही वाती लावायची आहेत. त्यानंतर आपण लवंग जी घेतली आहे ती लवंग आपल्या उजव्या हातात घट्ट पकडून हनुमानासमोर आपल्या मनात जे काही आहे आपल्या जीवनात ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सर्व अडचणी आपण सांगायच्या आहेत. आणि ह्या मंत्राचे उच्चारण आपल्याला ११ वेळा करायचे हा मंत्र आहे “ओम नमो हनुमते भय भंजनाय सुखम कुरु कुरु फॅट स्वः” हे करून झाल्यानंतर ती हातातील लवंग शेवटी दिव्यामध्ये टाकायची आहे. आणि आपण हनुमान चालीसा चा पाठ करायचा आहे.

हा उपाय आपल्याला अश्याच पद्धीतीने करायचा आहे. तुमच्या जीवनांमध्ये कोणतेही समस्या असतील त्या सर्व समस्या दूर होतील. आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील. पण आणखी एक गोष्ट आपण हा उपाय करत असताना ह्या उपाय आपण करत आहोत ह्याबद्दल आपण कोणाला सांगायचे नाही. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट