गुडघेदुखी हि एक खुप मोठी समस्या सर्वाना होत आहे. जवळपास जे वयोवृद्ध आहेत अशा लोकाना तर हा त्रास सर्वाना होत आहे. वयामुळे हा त्रास होत जाणे सहाजिक आहे पण काही व्यक्ती असे आहेत. ज्यांचे वय कमी असून सुद्धा त्याना गुडघेदुखीचा त्रास खुप जाणवत आहे. अशा वेळी पण बरेच विविध उपाय आणि औषध घेत असतो तरी सुद्धा काही प्रमाणत हा त्रास कमी होतो पण तो पूर्ण बरा होत नाही.
सांधे दुखी किंवा गुडघेदुखी या समस्यांचे मूळ कारण म्हणजे वेळेवर न होणारे जेवण, जास्त प्रमाणात फास्ट फूड खाणे, त्याचबरोबर आहारामध्ये योग्य प्रमाणत जीवनसत्वांचा अभाव. त्यामुळे शरीराला योग्य व्हिटॅमिन मिळत नाही. अशा वेळी शरीराची व शरीरातील इतर प्रक्रिया योग्य प्रमाणत कार्य करत नाही. आणि आपण इतर आजारांना आमंत्रण देत राहतो. मित्रांनो योग्य आहार आणि पुरेशी झोप या दोन गोष्टी चागल्या प्रकारे केल्या तर काही प्रमाणात आपले आजार कमी होतात.
मुळात गुडघेदुखी हा त्रास का होतो हे जाणून घेऊ. आपला गुडघा चार हाडांपसून तयार होतो, त्याचबरोबर लिगामेंट्स, मांसपेशी यांचा हि त्यात समावेश असतो. त्यावर एक सायनोव्हियल थैली (synovial sac) नावाचे आवरण असते. हे एक प्रकारचे सायनोव्हियल फ्लुइड (synovial fluid) नावाचे द्रव्य तयार करते. हे द्रव्य आपला गुडघा ज्या वेळीस हालचाल करतो त्यावेळेस या द्रव्याचा वापर होत असतो. हे द्रव्य कमी झाले तर आपला गुडघेदुखीचा त्रास होत असतो.
या त्रासा वरती आपण एक आयुर्वेदिक उपाय जाणून घेऊ जो घरच्या घरी तयार करता येते. या साठी आपल्याला काही घटक लागणार आहेत. कोणते घटक लागणार आहेत आणि त्याचा उपयोग असा करायचा या बदल जाणून घेऊ. सर्व प्रथम आपल्याला दालचिनी लागणार आहे. या दालचिनी पासून एक चमचा पवडर तयार करायची आहे. या पवडर मध्ये आपल्याला एक चमच्या मध टाकायचा आहे. त्यानंतर त्यात खायचा चुना एक चमचा टाकायचा आहे. आणि सर्वात गुणकारी घटक म्हणजे हळद एक चमच्या घ्याची आहे. हे सर्व घटक चागल्या प्रकारे मिक्स करायचे आहेत.
हा लेप तयार झाल्यावर आपल्या गुडघ्यावर लावायचा आहे. हा लेप पूर्ण गुडघ्याला खालून वरून लावायचा आहे. हा लेप लावल्यानंतर दहा तास तसाच ठेवायचा आहे. असे एक दिवसा आड दोन आठवडे कराचे आहे. हा उपाय केल्याने तुम्हला गुडघेदुखीच्या समस्या पासून अराम मिळेल.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.




