घरगुती उपाय

२ एप्रिल गुढीपाडवा सकाळी अंघोळीपूर्वी करा हा एक उपाय, माता लक्ष्मी होईल प्रसन्न

मित्रांनो हिंदू नवीन वर्षाची सुरवात हि चैत्र प्रतिपदेपासून म्हणजेच गुढीपाडवव्यापासून होते. आपण गुढीपाडवा साजरा करतो आपण वर्षभरात जो साडेतीन मुहूर्त साजरा करतो त्यातील एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा मित्रांनो ह्या वर्षी २ एप्रिल शनिवारी हा गुढीपाडवा आलेला आहे. नवीन वर्षाची सुरुवात असल्याने ह्या दिवशी काही शुभ मंगल गोष्टी आपण अवश्य करा. कोणत्याही गोष्टीची सुरवात शुभ झाली कि येणारे संपूर्ण वर्ष हे शुभ व आनंदमय जाते.

येणारे संपूर्ण वर्ष आपले भरभराटीचे जाओ आनंदमय जाओ असे वाटत असेल तर आपण गुढीपाडव्याला हा एक उपाय अगदी छोटासा असा उपाय आपण नक्की करा. आपल्याला कटुंबातील सर्वानी हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबातील सर्वांचे आरोग्य देखील चांगले राहील तसेच आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश संपादन कराल.

मित्रांनो ह्या उपायांसाठी करायचे एकच आहे कि ह्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे शकयतो आपण ब्राह्ममुहूर्तावर उठावे. उठल्यानंतर आपण जे काही नित्यकर्मे आहेत ती सर्व आटोपायची आहेत. मात्र अंघोळ करण्यापूर्वी आपण मोहरीच्या तेलात आपण बेसन हळद गाईचे कच्चे दूध आपण एकत्र करावे.

हे चार पदार्थ म्हणजेच हळद आहे मोहरीचे तेल, बेसन व गाईचे दूध घ्याचे आहे गाईचे दूध नसेल तर आपण इतर दूध घेतले तरी चालते कारण हळदीमुळे त्या दुधाचे शुद्धीकरण आपोआप होते. ह्या चार गोष्टी आपण व्यवस्थित मिक्स करून आपण ह्याचे उटणे म्हणून आपल्या अंगावर ते लावायचे आहे. आपण आपले शरीर चांगले घासून चोळ्याचे आहे अगदी दिवाळीत करतो उटण्याने अंघोळ तश्या पद्दतीने आपण अंघोळ करायची आहे.

आपण अंघोळीपूर्वी अंघोळीच्या पाण्यात आपण काही कडुनिंबाची पाने देखील आपण टाकू शकता. स्नान केल्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर बसायचे आहे ह्यानंतर एक आणखी एक गोष्ट म्हणजे चैत्र प्रतिपदेपासून म्हणजेच गुढीपाडवा पासून चैत्र नवरात्रीला सुरवात होत आहे. देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते, म्हणून तुमच्या देवघरामध्ये देवी दुर्गेचा फोटो असेल तर आणखी चांगली गोष्ट आहे जर मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही काळजी करू नये आपण केवळ फक्त एक दिवा आपण देवी दुर्गेच्या नावाने प्रज्वलित करायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला एक मंत्र आहे तो आपण बोलायचा आहे मंत्र आहे, ॐ रिहम दुं दुर्गायै नमः ह्या मंत्राचा आपण १०८ वेळा म्हणजे एक माळ जप करायचा आहे. ह्या चैत्र नवरात्रीत आपण देवी दुर्गेची उपासना केल्यास आपल्या घराची भरभराट होण्यापासून कोणीदेखील रोखु शकणार नाही कोणत्याही प्रकारचे दोष असूदेत कोणत्याही प्रकारच्या बाधा असूद्यात देवीच्या कृपेने सर्व काही दूर होईल. आपण देवीला प्रार्थना करा संपूर्ण वर्षभरात तुम्हाला जे काही मागणे आहे ते तुम्ही देवीला मागा.

सोबतच तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुम्ही दिवसभरात मनातल्या मनात ह्या देवीच्या मंत्राचा जप करवा. आणि सायंकाळी शक्य झाल्यास दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण अवश्य करा. पाठ करणे शक्य नसेल तर आपण त्यातिल तुम्ही अगदी शेवटचा अध्याय जरी केला तरी पुरेसे आहे. सर्वाना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट