नमस्कार मित्रांनो येत्या काही दिवसात श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे. यादिवशी स्वामींची मनापसून हि एक सेवा आपण सर्वानी मिंळून केली तर आपल्याला अनेक लाभ होतील. जे नवीन भक्त आहे जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना ह्या दिवशी नेमके काय करायचे हे माहित नसते. आजच्या लेखात आपण स्वामींना प्रसन्न करणारी एक नित्य व सोपी सेवा सांगणार आहोत. ह्या सेवेने स्वामी तुमच्यावर लवकर प्रसन्न होतील तसेच आपल्याला ह्या सेवेने खूप लाभ देखील मिळेल.
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन
मित्रांनो ह्या दिवशी आपण सकाळी आपण लवकर उठा सकाळी स्नान करून आपण स्वामींचे दर्शन घ्या घरातच स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावावा तसेच स्वामींच्या फोटोसमोर अगरबत्ती लावावी तसेच काही फुले आपण अर्पण करावीत. त्यानंतर आपण तुम्हाला जितक्या माळी शक्य असेल तितक्या माळी श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा आहे. कमीत कमी १ माळ तसेच जास्तीत जास्त तुम्हाला जमतील तेव्हड्या ११, २१, ५१, .. इत्यादी.
स्वामींचे नामजप म्हणजे दिवसभर आपण काम करत करत आपण स्वामींचे नामजप करावा. त्यानंतर आपण संध्यकाळी देखील दिवा लावनेच्या वेळी देखील आपण जितका शक्य असेल तितक्या माळी स्वामींच्या नामाचा जप करा. तुमच्यकडून ह्या दिवशी जास्त काही जमले नाही तरी चालेल परंतु तुम्ही ह्या स्वामी समर्थ नामाचा जप मात्र जास्तीत जास्त वेळा करावा.
मित्रांनो आपण स्वामींच्या आवडते पदार्थ कोणते असा देखील प्रश्न पडत असेल आणि ह्या दिवशी आपण म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनी आपण स्वामींना नैवेद्य कोणता दाखवावा तो कसा बनवायचा. मित्रांनो प्रेत्येक देवाचा एक विशिष्ट पदार्थ आवडता असतो तसेच काही स्वामींचे देखील आवडते पदार्थ आहेत. जसे बेसनाचे लाडू, पुरणपोळी हे दोन पदार्थ हे स्वामींना अत्यंत प्रिय पदार्थ आहेत. तिखट पदार्थांमध्ये कांदा भजी तुम्हाला स्वामींना नैवद्य दाखवायचा असेल तर आपण पुरणपोळी खीर, आमटीभात, पापड, कांदाभजी असा पूर्ण नैवेद्य तुम्ही ह्या दिवशी दाखवायचा आहे.
तसे तर स्वामी ताटात काय दिलय पाहत नाहीत तर ते आपल्या भक्तांचा प्रेम भाव बघतात तुम्ही किती प्रेमाने तो जेवणाचा नैवैद्य देता हे महत्वाचे असते, मग तुम्ही दही भात किंवा दूधभात अगदी कोणतेही शाहकारी जेवण तुम्ही स्वतःसाठी बनवाल तेच तुम्ही नैवद्य म्हणून दाखवले तरी चालेल. शेवटी तुमचा भावना महत्वाची आहे.
म्हणून तुम्हाला जमेल तसा नैवेद्य आपण दाखवू शकता, शक्य झाल्यास आपण बेसनाचे लाडू, व कांदाभजी आपण नैवद्य म्हणून दाखवावा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद




