नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो घरातील लक्ष्मीने गृहलक्ष्मीने स्नान आटोपून हा एक उपाय नक्की करावा, घरात पैस्यांची तंगी कधीच जाणवणार नाही. गृहलक्ष्मी म्हणजेच आपल्या घरातील स्त्री महिला मित्रांनो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी व अन्नपूर्णा मातेचा कृपाआशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर आपल्या स्वयंपाक घरात जो गॅस असतो ज्याला आपण गॅस ची शेगडी असे म्हणतो, किंवा घरात स्टोव्ह, चूल किंवा आणखी काही असेल तर त्यांना स्पर्श करून आपण हा एक मंत्र नक्की बोलावा माता लक्ष्मी प्रसन्न होते.
अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने घराची भरभराट होऊ लागते. हा मंत्र नक्की कोणता आहे आणि त्याची विधी काय आहे तेही आपण आपल्या आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. गृहलक्ष्मीने सकाळी उठल्यानंतर स्नान आधी आटोपून आपल्या स्वयंपाकघरात जावे एक दिवा प्रज्वलित करावा तेलाचा नाहीतर तुपाचा.
आपण गॅस शेगडीच्या जवळ हा दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर आपण थोडीशी चिमूठभर हळद आपण शेगडी वरती शिंपडायची आहे. आणि त्यानंतर आपण आपले दोन्ही हात शेगडी वरती ठेवून शक्यतो सकाळी अजून शेगडी गरम नसते म्हणून असे दोन्ही हाथ आपण गॅस वरती ठेवून हा मंत्र म्हणायचं आहे.
मंत्र आहे देहि सौभाग्यमारोग्यम देहि मे परम सुखम । रूपं देहि जयं देहि यशो वेहि द्विषो जाहि ।। मित्रांनो हा मंत्र आपण कमीत कमी ३ वेळा नंतर तुम्ही तो मी ७ वेळा ९ वेळा इत्यादी वेळा आपण बोलू शकता वेळ नसेल तर केवळ एकदा बोलला तरी तुम्हाला अत्यंत शुभ फळे प्राप्त होतात. माता अन्नपूर्णेचा कृपाआशीर्वाद आपल्याला मिळतो. हा उपाय आहे तो तर आपण कराच मात्र झोपण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट आपल्या किचन मध्ये रात्री खरकटी भांडी ठेवू नका.
आपला जो स्टोव्ह आहे जी शेगडी आहे ती स्वच्छ पुसून ठेवा त्यावर कुठेही घाण नसेल ह्याची काळजी घ्या. एकंदरीतच किचन साफ स्वच्छ असायला हवे ह्याची काळजी घ्या म्हणजे वास्तुदोष निर्माण होत नाहीत. आणि रात्री झोपण्यापूर्वी दुधाचे दोन चार थेंब शेगडी वरती शिंपडा कच्चे दूध शक्यतो वापरावे म्हणजेच न तापवलेले दूध अश्या गाईच्या दुधाचे थेंब शिंपडल्याने घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष नाहीसे होतात.
स्वयंपाकघरातील वास्तुदोष नाहीसे होऊन घराची भरभराट होऊ लागते. अत्यंत प्रभावशाली उपाय आहे, जर घरात महिला नसतील तर पुरुषसुद्धा हा उपाय करू शकतात. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




